चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात 19 फेब्रुवारी पासून होणार आहे. तत्पूर्वी काही संघांमधील अनुभवी खेळाडू दुखापतीच्या करणारे संघाबाहेर पडले आहेत. त्यातच इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेट इंग्लंडविरुद्ध भारत मालिकेदरम्यान दुखापती झाला होता. ज्यामुळे म्हटले जात होते की तो चॅम्पियन ट्रॉफी खेळेल की नाही. पण आता इंग्लंड संघासाठी एक चांगली बाब समोर आली आहे. ज्यामध्ये सांगितले आहे की, बेन चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकदम फिट आहे आणि तो चॅम्पियन्स ट्रॉफी खेळू शकतो.
आत्ताच मागच्या काही दिवसात भारत – इंग्लंड दोन्ही संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. ज्यातील शेवटचा सामना 12 फेब्रुवारी रोजी खेळण्यात आला होता. या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याच्या मांडीला दुखापत झाली होती .त्यामुळे डकेटला भारत सोडून उपचार करण्यासाठी यूएईला पाठवण्यात आलं होतं. आता त्याच्याबद्दल एक चांगली गोष्ट समोर आली आहे.
इंग्लंडच्या वेल्स क्रिकेट बोर्डने शनिवारी माहिती दिली आहे की, डकेटच्या दुखापतीची चाचणी केल्यानंतर आता रिपोर्ट समोर आला आहे .त्यात सांगितले आहे की इंग्लंडचा फलंदाज बेन डकेट पूर्णपणे फिट आहे आणि तो चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे.
भारत इंग्लंडच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडच्यावतीने बेन डकेटने सर्वाधिक धावा केल्या. त्याने तीन सामन्यात 43.63 च्या सरासरीने 131 धावा केल्या त्यामध्ये त्याने एक अर्धशतकही केल आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी इंग्लंड संघाचे वेळापत्रक
22 फेब्रुवारी इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
26 फेब्रुवारी इंग्लंडविरुद्ध अफगाणिस्तान (गद्दाफीस्टेडियम,लाहोर)
1 मार्च इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका (नॅशनल स्टेडियम ,कराची)
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी इंग्लंड संघ
जॉस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस एटकिंसन, टॉम बैंटन, हैरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जेमी ओवरटन,जेमी स्मिथ, लियाम लिविंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वुड.
हेही वाचा
अल्लाह गझनफर बाहेर, ‘हा’ अनुभवी फिरकीपटू मुंबईच्या ताफ्यात दाखल, MI चा मोठा निर्णय!
‘एक वर्ष झालं, मुलाशी बोलूही शकलो नाही…’, शिखर धवनची वेदनादायी कहाणी, VIDEO
टीम इंडियाला मोठा धक्का.! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सलामीवीर खेळाडू दुखापतग्रस्त






