---Advertisement---

कपिल शर्माच्या शोमध्ये रोहितसह दिसणार भारताचे हे वर्ल्डकप विजेते स्टार्स! प्रोमो व्हिडिओ लॉन्च

---Advertisement---

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून 2024 टी20 विश्वचषकाचा खिताब जिंकला. आता या चॅम्पियन संघातील खेळाडू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. वर्ल्डकप प्रमाणे रोहित शर्मा येथे देखील या खेळाडूंचं नेतृत्व करताना दिसेल.

वास्तविक, नेटफ्लिक्स वरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’चा दुसरा हंगाम 21 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी एक प्रोमो व्हिडिओ लॉन्च करण्यात आला. या व्हिडिओमध्ये बॉलीवूडचे अनेक स्टार्स आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काही सितारे देखील दिसत आहेत. याशिवाय या प्रोमोमध्ये भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडूही दिसले.

या प्रोमो व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग हे भारतीय खेळाडू दिसले. व्हिडिओमध्ये कपिल शर्मा या खेळाडूंना प्रश्न विचारताना दिसत आहे. कपिल विचारतो की, मागील वेळी जेव्हा तुम्ही आले, तेव्हा भारतीय संघ उपविजेता होता. यावेळी तुम्ही चॅम्पियन बनून आलात. तुमच्यासाठी कपिल शर्मा शो लकी राहिला का? त्याच्या या प्रश्नावर भारतीय खेळाडू हसताना दिसतात.

 

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग हे भारताच्या टी20 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं तब्बल 17 वर्षांनंतर दुसरा टी20 विश्वचषक जिंकला. भारतीय संघानं अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यातील अखेरच्या षटकात सूर्यकुमार यादवनं डेव्हिड मिलरचा ऐतिहासिक झेल घेतला होता. यापूर्वी 2007 मध्ये टीम इंडियानं महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी20 विश्वचषक जिंकला होता.

हेही वाचा – 

गोलंदाजी प्रशिक्षक बनल्याची बातमी मिळताच मोर्ने मॉर्केलची प्रतिक्रिया काय होती?, भारतीय संघात येताच केला मोठा खुलासा
कोण आहे दुलीप ट्रॉफीमध्ये पहिलं शतक झळकावणारा प्रथम सिंह? सुरेश रैनाशी आहे खास नातं
“श्रेयस अय्यर स्वतःला कोहली समजतोय, त्याची पातळी…”, माजी क्रिकेटपटूनं वाभाडे काढले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---