भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जाहीर देखील करण्यात आला आहे. (16 ऑक्टोबर) रोजी दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर आमने-सामने असणार आहेत. तत्पूर्वी न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गैरी स्टीड यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
गैरी स्टीड यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, “भारतीय संघातील एखाद्याला दुखापत झाली, तर त्याचा इतर संघांच्या तुलनेत त्यांच्यावर परिणाम होत नाही. कारण त्याच्यासारखाच कुशल आणखी एक खेळाडू त्याच्याकडे तयार असतो.
पुढे बोलताना ते म्हणाले, “भारताकडे अनेक खेळाडू आहेत ज्यांना ते कॉल करू शकतात आणि ते खेळाडू तितकेच कुशल आहेत. त्यांच्याकडे अनुभवी खेळाडूंचा संघ आहे, ज्यांनी अनेक कसोटी खेळल्या आहेत. ते अशा प्रकारचे क्रिकेट खेळतात, ज्यामुळे तुमच्यासाठी येथे गोष्टी कठीण होतात. पण हेच आव्हान आम्हाला पेलावे लागणार आहे.”
न्यूझीलंडविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन-द्रविडचा ‘हा’ लाजिरवाणा रेकाॅर्ड, जो कोणताही फलंदाज मोडण्याचे स्पप्नही नाही पाहणार
आश्चर्यकारक! IND vs NZ; कसोटी सामन्यात ‘या’ खेळाडूने ठोकलेत सर्वाधिक षटकार!
IND vs BAN; शानदार विजयानंतर प्रशिक्षकाची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…