टोकियो पॅरालिम्पिक गेम्समध्ये भारतीची टेबल टेनिस खेळाडू भाविनाबेनने इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिक उपांत्यपूर्व फेरी गाठणारी भाविनाबेन पटेल ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. टोकियो गेम्समध्ये महिला एकेरीच्या वर्ग ४ मध्ये भाविनाबेनने ब्राझीलच्या जॉयस डी ऑलिवियराचा पराभव केला. भाविनाबेन भारतासाठी पदक जिंकण्यासाठी फक्त दोन पावले दूर आहे.
भारताचे ३४ वर्षीय पटेलने शेवटचे १६ सामने १२ -१०, १३ -११, ११-६ ने जिंकले. आता तिचा सामना सर्बियाच्या बोरिस्लावा पेरिच रँकोवीशी होईल. आता जर भाविनाबेनने उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला तर ती उपांत्य फेरी गाठेल.
भाविनाबेनने कबूल केले आहे की, उपांत्य फेरीत जिंकण्यासाठी तिला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. ती म्हणाली की, “माझ्या प्रशिक्षकाने मला प्रतिस्पर्धीच्या शरीराजवळ खेळण्यास सांगितले आणि मी तेच केले. पुढच्या फेरीतील सामना जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूशी आहे आणि मला सर्वोत्तम कामगिरी करायला लागणार आहे.
स्पर्धेतील भाविनाबेनचा हा पहिला विजय आहे. कारण तिला पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनी झोउ यिंगकडून ०-३ ने पराभूत व्हावे लागले. भाविनाबेनचे दोन सामन्यांतून तीन गुण होते आणि ते यिंगसह बाद फेरीत पोहोचू शकले.
शॅकलटनने विजय मिळवला
तत्पूर्वी, भाविनाबेन पटेलने ग्रेट ब्रिटनच्या मेगन शॅकलटनवर ३-१ असा विजय नोंदवला होता. या विजयानंतर भाविनाबेन पटेलला उप उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले. ४१ मिनिटे चाललेल्या सामन्यात भाविनाबेनने शॅकलटनचा ११- ७, ९-११, १७-१५, १३-११ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत भविनाबेन १२ व्या क्रमांकावर आहे, तर शॅकलटन ९ व्या क्रामांकावर आहे
मात्र, टेबल टेनिसमधील भारताचे दुसरे आव्हान संपले आहे. भारताचे टेबल टेनिसपटू सोनलबेन मनुभाई पटेल गटातील दोन्ही सामने गमावल्यानंतर बाहेर पडली.
महत्त्वाच्या बातम्या –
टेलरच्या दुकानात कामाला, पुढे रिक्षाचालक ते जगातील स्टार फलंदाज असा प्रवास करणारा तो
ब्रायन लारा होता त्याचे नेहमीचे गिऱ्हाईक, पण ब्रेट लीने त्याची जागा अक्षरशः खाल्ली
झहीर खानचा विराटसाठी खास ‘गुरुमंत्र’, बाजी पलटू शकते फक्त…