---Advertisement---

झहीर खानचा विराटसाठी खास ‘गुरुमंत्र’, बाजी पलटू शकते फक्त…

On: शुक्रवार, ऑगस्ट 27, 2021 7:58 PM
---Advertisement---

लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजयाची नोंद केल्यानंतर भारतीय संघ लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पूर्णपणे पिछाडीवर पडला आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजी इंग्लिश वेगवान गोलंदाजांसमोर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. अवघ्या 78 धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. यानंतर भारतीय संघाचे गोलंदाजही निष्प्रभ दिसले आणि ते इंग्लंडला आघाडी घेण्यापासून रोखू शकले नाहीत. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानने कोहलीला गुरूमंत्र दिला आहे, ज्याच्या आधारे भारतीय संघ हेडिंग्ले कसोटीत पुनरागमन करू शकतो.

झहीर खान म्हणाला, ‘त्यांना काही ना काही मार्ग शोधावा लागेल. त्यांना काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करावा लागेल. जेव्हा मी वेगळं बोलतो, तेव्हा माझा अर्थ तांत्रिक नाही, पण माझा अर्थ वेगळ्या मानसिकतेने भारतीय संघास खेळण्याची गरज आहे. कसोटीच्या पहिल्या दिवसाबद्दल विराट जितका अधिक विचार करेल तितक्याच गोष्टी त्याच्यासाठी कठीण होतील. भारतीय संघाने हा दिवस विसरणे आवश्यक आहे.’

‘आत्तापर्यंत भारतीय संघाच्या बाजूने, ना फलंदाजी ना गोलंदाजी चांगली झालेली आहे. भारतीय संघाने हे लवकरात लवकर विसरलं पाहिजे. पण दुर्दैवाने तुम्ही ते करू शकत नाही, कारण उद्या तुम्हाला पुन्हा मैदानात उतरावे लागेल. जेव्हा तुम्ही अशा स्थितीत असतात तेव्हा ते विसरणे आणि सामन्यात पुनरागमन करणे सोपे नसते.

दरम्यान, लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार विराट कोहलीचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. इंग्लिश गोलंदाजांच्या धारदार गोलंदाजीसमोर भारताचा एकही फलंदाज टिकू शकला नाही आणि अवघ्या 78 धावा केल्यावर संपूर्ण संघ बाद झाला. दुसरीकडे इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 432 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारावर इंग्लंडने 354 धावांची आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम रूटच्या निशाण्यावर, पुढील दोन कसोटीत असेल संधी

यशस्वी जयस्वालच्या धमाक्याने मुंबईची ओमानवर मात, मालिकेत केली बरोबरी

‘मुंबई इंडियन्स साधणार विजेतेपदाची हॅट्रिक, भारतही जिंकेल टी२० विश्वचषक’, हार्दिक पंड्याचा विश्वास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---