लवकरच इंग्लंडमध्ये द हंड्रेड लीगचा थरार रंगणार आहे. या लीगची सुरुवात होण्यापुर्वी नार्दर्न सुपरचार्जर्स संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू प्लेसिस याला या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याच्यापुर्वी आरोन फिंच नॉर्दर्न सुपरचार्जर्सचा कर्णधार होता. यासंबंधीची माहिती शुक्रवारी (०२ जुलै) द हंड्रेड लीगच्या आयोजकांनी दिली आहे.
कोविड -19 च्या वाढत्या प्रभावामुळे बर्याच परदेशी खेळाडूंनी या स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे अवघ्या २ आठवड्यांवर आलेल्या या स्पर्धेसाठी संघ आणि आयोजकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. काही कारणास्तव माघार घेतलेल्या खेळाडूंची जागा भरुन काढत त्यांनी नवीन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डु प्लेसीने ‘द हंड्रेड’ च्या वेबसाइटला बोलताना सांगितले की, ‘पहिल्या सत्रात नॉर्दर्न सुपरचार्जर्सचे नेतृत्व करणे माझासाठी सन्मानाची गोष्ट आहे. बेन स्टोक्स, आदिल रशीद आणि ख्रिस लिन यांच्यासमवेत खेळणे खरोखर रोमांचक ठरेल. या संघात अनेक युवा कौशल्यही आहे.’
त्याचबरोबर महिला स्पर्धेचे देखील आयोजन केले जात आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेची खेळाडू लॉरा वोलवार्ट सुपरचार्जरमध्ये ऑस्ट्रेलियाची स्टार विकेटकीपर फलंदाज एलिसा हेलीची जागा घेईल.
‘द हंड्रेड’ची थोडीशी माहिती
इंग्लंड आणि वेल्सच्या प्रमुख शहरांमध्ये आठ पुरुष आणि महिला संघांचा समावेश असलेल्या द हंड्रेड लीगमध्ये 100 चेंडूंचा एक सामना होईल. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाद्वारे (ईसीबी) ही स्पर्धा चालविली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मागीलवर्षी ‘द हंड्रेड’ लीगला स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा ही स्पर्धा 22 जुलैपासून ओवल इनविन्सिबल्स आणि मैनचेस्टर ओरिजिनल्स यांच्यातील सामन्याने सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराटच्या नेतृत्त्वपदाला कसलाही धोका नाही, उलट तो कॅप्टन्सीमध्ये विश्वविक्रम करेल,’ दिग्गजाचा दावा
श्रीलंकेच्या निवडकर्त्यांची घोषणा, धवनसेनाविरुद्ध ‘द्वितीय श्रेणी’चा संघ उतरवणार! ‘हे’ आहे कारण
‘फलंदाजीवर लक्ष दिले असते तर आयपीएलमधून बक्कळ पैसा कमावला असता,’ अव्वल गोलंदाजाला खंत





