इंग्लंडमध्ये सध्या द हंड्रेड ही १०० चेंडूची स्पर्धा सुरू आहे. हे क्रिकेटमधले वेगळ्या प्रकारचे स्वरूप आहे, ज्यात केवळ १०० चेंडूंचा समावेश आहे. यामध्ये जगभरातील वेगवेगळ्या संघातील खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत एकूण आठ संघ आहेत. यातीलच ओवल इन्विजीबल आणि वेल्श फायर या दोन संघात स्पर्धेतील १६व्या सामन्यादरम्यान एक असा किस्सा घडला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
या सामन्यात ओवल इन्विजीबल कर्णधार सॅम बिलींग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाला रिसे टाॅप्ले या गोलंदाजाने योग्य निर्णय ठरवत एकाच षटकात २ विकेट्स घेतल्या. दरम्यान, वेल्स फायरचा सलामीचा फलंदाज जोशुआ कोब्ब मैदानात राहून चांगली खेळी करत होता. त्यामुळे त्याच्याकडून मोठी धावसंख्या उभारण्याची अपेक्षा होती. परंतु त्याच्या एका नजर चुकीमुळे तसे होऊ शकले नाही आणि तो धावबाद झाला.
झाले असे की, टोप्ले हा ११ ते १५ चेंडूच्या सेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. तेव्हा त्याच्या पहिल्याच चेंडूवर त्याने टॉम बेंटनला बाद करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली. नंतरच्या दुसऱ्याच चेंडूवर वेल्स फायरचा कर्णधार बेन डकेटने स्ट्रेट ड्राईव्ह मारला. ज्यात चेंडू अडवताना टोप्लेच्या बोटांना लागून चेंडू यष्टीला (स्टंपला) लागला. त्यावेळी दुसऱ्या बाजूला उभा असलेला कोब्ब चेंडूकडे न पाहता क्रीज सोडून एक धाव घेण्याच्या विचारात. त्याने आपली बॅट क्रिजच्या रेषेवरुन उचलली आणि चेंडू जाऊन यष्टीला धडकला.
https://twitter.com/kaustats/status/1422264269211529217?s=20
यामुळे दुर्दैवाने तो धावबाद होतो. एका नजरचुकीने त्याला आपली विकेट गमवावी लागली. आता याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यावर क्रिकेटप्रेमी वेगवेगळ्याप्रकारे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
अमेरिकेत ‘या’ भारतीय धुरंधराचा झंझावात, पहिल्याच सामन्यात नाबाद ९९ धावा कुटत जिंकवला सामना
क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! लवकरच सुरू होतेय आयपीएलसारखी मोठी टी२० टूर्नामेंट, जाणून घ्या त्याबद्दल
पक्कच समजा! नॉटिंघम कसोटीत ‘हा’च असणार रोहितचा सलामी जोडीदार, नुकतंच झळकावलंय शतक






