जागतिक क्रिकेटमध्ये भारत वगळता जवळपास सर्वच क्रिकेट बोर्ड मागच्या काही वर्षांपासून एका समस्येचा सामना करत आहेत. लीग क्रिकेटमध्ये अनेक देशांचे खेळाडू राष्ट्रीय संघापेक्षा लीग फ्रँचायझीला महत्व देताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी लवकरच या समस्येवर उपाय काढण्यासाठी मोठा निर्णय घेऊ शकते.
लीग क्रिकेटचे वाढते महत्व पाहून अनेकजण याविषयी चिंता व्यक्त करत आहेत. यातील बहुतांशजण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील माजी खेळाडू आहेत. या दिग्गजांच्या मते सध्या लीग क्रिकेटला अधिक महत्व मिळत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट एकप्रकारे संपत चालले आहे. लीग क्रिकेट खेळण्यासाठी काही खेळाडूंनी राष्ट्रीय संघासोबतचा आपला करार देखील मोडला आहे. तर काही खेळाडू राष्ट्रीय संघाची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. खेळाडू जर अशाच प्रकारे राष्ट्रीय संघाची साथ सोडत राहिले, तर एक वेळ अशीही येऊ शकते की, राष्ट्रीय संघाकडे खेळण्यासाठी दर्जेदार खेळाडूच नसतील.
भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊ आयसीसी लवकरच पाऊळ उचरणार आहे. द टेलिग्राफने दिलेल्या माहितीनुसार लीग क्रिकेटला मर्यादा घालण्यासाठी आयसीसी दोन महत्वाचे नियम आमलात आणण्याचा विचार करत आहे. माहितीनुसार इंडियन प्रीमियर लीगमध्ये वापरला जाणारा नियम आयसीसी आमलात आणण्याच्या विचारत आहे. या नियमानुसार कोणतीही फ्रँचायझी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ चार विदेशी खेळाडूंना खेळवू शकते. यात एक नियम अधिकचा समील केला गेला आहे. या नियमानुसार फ्रँचायझीने एखाद विदेशी खेळाडू खरेदी केल्यानंतर त्याच्याशी संबंधित क्रिकेट बोर्डाला देखील या फ्रँचायझीला ठराविक रक्कम द्यावी लागणार आहे.
यूएईत आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लीग टी-20 (ILT20) मध्ये असा नियम आहे की, एक फ्रँचायझी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकूण 9 विदेशी खेळाडूंना केळवू शकते. पण आयसीसीने जर हे दोन नियम अमलात आणले, तर यूएईतील या लीगला देखील आपल्या नियमात बदल कारावा लागेल. वृत्तांमध्ये असेही सांगितले गेले आहे की, विदेशी खेळाडू खरेदी केरणाऱ्या फँचायझीला त्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या रकमेच्या किमान 10 टक्के रक्कम ही संबंधित क्रिकेट बोर्डाला द्यावी लागू शकते. संबंधित क्रिकेट बोर्ड आर्थिक दृष्टी भक्कम होण्यासाठी आयसीसी असा विचार करत असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
रोहितची जागा घेणार ‘हा’ युवा ओपनर! वेस्ट इंडीज दौऱ्यात संधी मिळण्याची शक्यता
मराठमोळ्या श्रेयांकाची अभिमानास्पद कामगिरी, फक्त 2 धावा खर्चून हाँगकाँगचा अर्धा संघ पाठवला तंबूत