---Advertisement---

भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरणारा गोलंदाज इंग्लंड संघात परतला, प्लेइंग 11 मध्ये स्थान निश्चित

Team England
---Advertisement---

एजबेस्टन कसोटी सामन्यात मिळालेल्या विजयाचा जल्लोष साजरा करत असलेल्या टीम इंडियासाठी (team india) इंग्लंड खेम्यातून एक वाईट बातमी समोर येत आहे. लॉर्ड्समध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांची झोप उडवण्यासाठी जोफ्रा आर्चर (Jofra Archer) पुन्हा संघात परतला आहे. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅकुलम यांनी अधिकृतपणे जाहीर केले आहे की, आर्चर लॉर्ड्समध्ये प्लेइंग 11 चा भाग असणार आहे. कौटुंबिक कारणामुळे आर्चर दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. मात्र, आता तो मालिकेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तिसऱ्या सामन्यात आपल्या वेगवान गोलंदाजीने कहर माजवताना दिसेल. इंग्लंडने गस एटकिन्सनलाही आपल्या संघात सामील करून घेतले आहे.

इंग्लंडचे हेड कोच ब्रेंडन मॅकुलम यांनी हे स्पष्ट केले आहे की, जोफ्रा आर्चर भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या अंतिम 11 मध्ये असेल. आर्चरच्या पुनरागमनामुळे इंग्लंडच्या गोलंदाजी आघाडीला खूपच ताकद मिळणार आहे. आर्चरला इंग्लंडची खेळपट्टी नेहमीच मानवते. या वेगवान गोलंदाजाने इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 8 कसोटी सामने खेळले असून, या काळात त्याने 30 विकेट्स घेतल्या आहेत. एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रम त्याने दोनदा केला आहे. भारताविरुद्ध त्याने २ कसोटी सामने खेळले असून, यात त्याने एकूण 4 विकेट घेतल्या आहेत.

इंग्लंडला भारताविरुद्ध दुसऱ्या टेस्टमध्ये 336 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडच्या फलंदाजांचा खेळ खूपच निराशाजनक ठरला. भारताने दिलेल्या 608 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची संपूर्ण टीम फक्त 271 धावा करून ऑलआऊट झाली. चौथ्या डावात इंग्लंडकडून जेमी स्मिथने सर्वाधिक 88 धावांची खेळी केली, पण तोसुद्धा पराभव टाळू शकला नाही. विशेष म्हणजे एजबेस्टनमध्ये इंग्लंडला भारताविरुद्ध पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---