---Advertisement---

IND vs ENG : एजबॅस्टन कसोटी जिंकून गिलने रचला इतिहास; मोडला गावस्करचा 49 वर्ष जुना विक्रम

On: सोमवार, जुलै 7, 2025 8:13 PM
---Advertisement---

रविवारी (6 जूलै 2025) झालेल्या इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा 336 धावांनी पराभव केला. कर्णधार म्हणून शुभमन गिलचा हा पहिलाच विजय आहे. एजबॅस्टन येथे खेळली गेलेली ही कसोटी जिंकून गिलने इतिहासाच्या पानांवर आपले नाव कोरले. गिल आता परदेशात भारतीय कर्णधार म्हणून कसोटी जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. यादरम्यान, गिलने माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांचा 49 वर्ष जुना विक्रम मोडला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात गिलने दोन्ही डावात 430 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात गिलने शानदार द्विशतक झळकावले होते. त्यानंतर गिलने दुसऱ्या डावात 161 धावा केल्या. गिलच्या या उत्कृष्ट खेळीमुळे भारतीय संघाने इंग्लंडवर मोठा विजय मिळवला.

यासह, गिल परदेशात भारतीय कर्णधार म्हणून कसोटी सामना जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. गिलने वयाच्या अवघ्या 25 वर्षे आणि 301 दिवसांत ही कामगिरी केली. गिलने गावस्करचा 49 वर्षांचा विक्रम मोडला. गावस्कर यांनी 1976 मध्ये 26 वर्षे 202 दिवसांच्या वयात ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवून हा विक्रम केला होता.

भारताने 58 वर्षांपासून एजबॅस्टनवर एकही कसोटी जिंकलेली नाही. टीम इंडियाने 1967 मध्ये येथे पहिला कसोटी सामना खेळला होता, परंतु आतापर्यंत त्यांना एजबॅस्टन येथे विजय मिळवता आला नव्हता. कपिल देव, विराट कोहली आणि एमएस धोनी सारखे दिग्गज खेळाडूही त्यांच्या नेतृत्वाखाली या मैदानावर भारताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. 8 कसोटी सामन्यांनंतर भारताला या सामन्यात विजय मिळाला. याआधी भारताने 7 सामने गमावले होते. तिथे एक सामना अनिर्णित राहिला. पण रविवारी (6 जूलै 2025), एजबॅस्टन येथे गिलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच विजय मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---