भारतीय महिला निवड समितीने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर केला. भारत १० सप्टेंबरपासून इंग्लंडमध्ये तीन टी२० आणि तीन वनडे सामने खेळणार आहेत. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाते नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे दिले आहे. तर वनडे संघात झुलन गोस्वामी आणि अष्टपैलू खेळाडू जेमीमाह याचे संघात पुनरागमन झाले आहे. या दोघींचे संघात पुनरागमन होताच, त्यातील एकीचा इंग्लंड दौऱ्यातील शेवटचा सामना तिच्या कारकिर्दीसाठी विशेष ठरणार आहे.
झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) ही बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीमध्ये सराव करत होती, तसेच तिला मागील महिन्यातच भारतीय संघाचा नियमित उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) याला गोलंदाजी करताना पाहिले होते. जेव्हा तिला श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी संघातून वगळले तेव्हा तिच्या भविष्यातील कामगिरी बाबत चर्चा सुरू झाल्या. तर आता पुन्हा एकदा ही ३९ वर्षीय खेळाडू भारताची निळी जर्सी घालून मैदानावर खेळताना दिसणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाजी झुलन गोस्वामी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसणार. इंग्लंड दौऱ्यासाठी तिची संघात निवड झाली आहे. तिने भारतासाठी शेवटचा सामना विश्वचषकात खेळला होता. तर इंग्लंड दौऱ्यासाठी ती चार महिन्यानंतर संघात परतली आहे. मात्र काही वृत्तानुसार, आगामी इंग्लंड दौऱ्यातील तिचा हा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे.
मीडियातील काही रिपोर्ट्सनुसार, झुलनचा इंग्लंड दौऱ्यातील तिसरा वनडे सामना आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असण्याची शक्यता आहे. हा सामना लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे.
झुलन ही वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज आहे.
झुलनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
झुलनने २००२मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. मागील दोन दशकांपातून ती भारतीय संघासाठी खेळत आहे. तिने २०१ वनडे सामन्यात २५२ विकेट्स घेतल्या आहेत. महिला वनडेमध्ये ती २०० पेक्षा अधिक विकेट्स घेणारी एकमेव गोलंदाज आहे.
झुलनने ६८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ५६ आणि १२ कसोटी सामन्यांत ४४ विकेट्स घेतल्या आहेत. ती वनडेमध्ये १००० पेक्षा अधिक धावा आणि २०० पेक्षा अधिक विकेट्स घेणारी एकमेव खेळाडू आहे.
विशेष म्हणजे, झुलनने तिचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंड विरुद्धच खेळला आहे. चेन्नईमध्ये झालेल्या त्या वनडे सामन्यात तिने ७ षटके टाकताना १५ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना भारताने ८ विकेट्सने जिंकला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या वनडेतून भारताचा ‘हा’ मॅच विनर खेळाडू बाहेर, झिम्बाब्वेतही २ प्रमुख बदल; पाहा प्लेइंग Xi
कौतुक करावे तितके कमीच! झिम्बाब्वे बोर्डाने भारताविरुद्धची दुसरी वनडे ‘या’ लोकांना केलीय समर्पित
ज्या वयात क्रिकेटर्स घेतात निवृत्ती, त्या वयात ब्रॉडचा अद्भुत कॅच; सुपरमॅनसारखा झेपावला हवेत