दिल्ली | २२ जून ते ३० जून दरम्यान होणाऱ्या कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेसाठी भारतीय पुरुष कबड्डी संघ आज रवाना झाला. भारतीय संघाने आज सकाळी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली येथून दुबईकडे प्रयाण केले.
याचा फोटो अष्टपैलु खेळाडू संदिप नरवाल तसेच कर्णधार अजय ठाकूरने आपल्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केला आहे.
तसेच भारतीय संघातील बाकी खेळाडूंनीही सेल्फी शेअर केले आहेत.
या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा अजय ठाकूरकडे सोपविण्यात आली आहे. २३ ते २६ नोव्हेंबर या काळात गोरगन, इराण येथे एशियन कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेतही त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तेव्हा त्याने भारतीय संघाला विजय मिळवुन दिला होता.
दुबई मास्टर कबड्डी स्पर्धा २२ ते ३० जून या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, इराण, कोरिया, केनिया आणि अर्जेंटीना या देशांचे संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेकडे एशियन्स गेम्सची रंगीत तालिम म्हणुन पाहिले जात आहे.
https://www.instagram.com/p/BkMMbJzj-mk/?hl=en&taken-by=sandeepnarwal110
https://www.instagram.com/p/BkMdlAvhDZl/?hl=en&taken-by=monu_goyat
https://www.instagram.com/p/BkMVr1ojFXU/?hl=en&taken-by=surender.nada1
https://www.instagram.com/p/BkMTOpohWzC/?hl=en&taken-by=chhillar.mohit
https://www.instagram.com/p/BkMXNU5BRAd/?hl=en&taken-by=deepak_hooda_kabaddi
https://www.instagram.com/p/BkMfXJClWNA/?hl=en&taken-by=rohit.c.akki
कबड्डीच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या-
–आरती बारी यांची मास्टर दुबई कबड्डी स्पर्धेसाठी पंच म्हणुन निवड
–मास्टर दुबई कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी संघ जाहीर
–प्रो-कबड्डी लिलावात महाराष्ट्राचे हे खेळाडू झाले मालामाल
–४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख








