सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. दरम्यान भारतीय संघ आगामी ऑस्ट्रेलियाविरूद्ध बाॅर्डर गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये युवा प्रतिभावान अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला संधी मिळाली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरताना दिसणार आहे.
नुकतेच बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताकडून पदार्पण करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीची बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. नितीश फलंदाजीसोबतच वेगवान गोलंदाजीही करतो. ऑस्ट्रेलियन भूमीवर वेगवान गोलंदाजी करणारे अष्टपैलू प्रभावी दिसतात. अशा परिस्थितीत नितीश कुमार देखील बॉर्डर गावसकर मालिकेत भारतासाठी कसोटी पदार्पण करताना दिसू शकतो.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
बॉर्डर गावसकर मालिकेचं पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
सेहवागने राजकारण करुन मला फसवलं! पंजाब किंग्जच्या माजी कर्णधाराचे गंभीर आरोप
चेंडू लागला, रक्तस्त्राव होऊ लागला; तरीही पाकिस्तानच्या खेळाडूने सोडलं नाही मैदान
पुणे कसोटी हरल्यानंतरही भारत WTC अंतिम सामना खेळू शकतो का? न्यूझीलंड जिंकल्यास समीकरण किती बदलेल?