---Advertisement---

सेहवागने राजकारण करुन मला फसवलं! पंजाब किंग्जच्या माजी कर्णधाराचे गंभीर आरोप

On: शुक्रवार, ऑक्टोबर 25, 2024 9:50 PM
Virendra-Sehwag-Talks
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने भारताचा महान सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागवर जोरदार हल्ला चढवला आहे. मॅक्सवेलने त्याच्या ‘द शोमॅन’ या पुस्तकात दावा केला आहे की आयपीएल 2017 मध्ये सेहवागने पंजाब किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनच्या निवडीत कोणतीही भूमिका बजावू शकणार यासाठी प्रयत्न केले होते. मॅक्सवेल 2017 मध्ये पंजाबचा कर्णधार होता.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, ग्लेन मॅक्सवेल म्हणाला, “जेव्हा मी सेहवागला कसोटी मालिकेदरम्यान भेटलो तेव्हा त्याने मला पंजाब किंग्जचा कर्णधार बनवण्याबद्दल सांगितले. आम्ही एकत्र खेळलो होतो, पण निवृत्तीनंतर तो पंजाबच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावत होता. आम्ही संघ कसा चालवायचा याबद्दलही बोललो, मला असे वाटले की आम्ही मित्र बनत आहोत.”

सेहवाग नावाचा मार्गदर्शक होता, तो संपूर्ण संघ चालवत होता
ग्लेन मॅक्सवेलने एक मोठा दावा केला आणि असेही सांगितले की, जे अरुण कुमार यांची 2017 च्या हंगामात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. थोड्याच वेळात हे स्पष्ट झाले की अरुण कुमार नावालाच प्रशिक्षक आहेत,. खरे तर सेहवागच संघ चालवत आहे. याबद्दल मॅक्सवेल म्हणाला, “इतर प्रशिक्षक आणि खेळाडू मला विचारायचे की काय चालले आहे. मी त्यांना स्पष्ट उत्तर देऊ शकलो नाही.”

सर्व प्रशिक्षकांनी चर्चा करण्यासाठी व्हॉट्सॲपवर एक ग्रुप तयार करावा अशी कल्पना मॅक्सवेलने मांडली असतानाही सेहवागने ही कल्पना साफ नाकारली. मॅक्सवेलच्या म्हणण्यानुसार, आयपीएल 2017 च्या शेवटच्या साखळी टप्प्यातील सामन्यांमध्ये रायझिंग सुपर जायंट्सविरुद्ध पंजाबचा संघ अवघ्या 73 धावांत सर्वबाद झाला तेव्हा त्याने पत्रकार परिषदेत जबाबदारी स्वीकारण्याची ऑफर दिली होती. पण पत्रकार परिषद झाली तेव्हा सेहवागने संघाच्या खराब कामगिरीचा संपूर्ण दोष ग्लेन मॅक्सवेलवर टाकला होता.

त्यानंतर कधीच बोललो नाही
ग्लेन मॅक्सवेल सांगतो की त्या कॉन्फरन्सनंतर त्याने वीरेंद्र सेहवागला मेसेज केला आणि त्याला सांगितले की त्याच्या वक्तव्याने तो किती दुखावला गेला आहे. मॅक्सवेलने त्या दिवशी सेहवागला आपला आदर्श मानणे बंद केले होते. या सगळ्याला उत्तर देताना सेहवाग म्हणाला, “मला तुझ्यासारखा चाहता नको आहे.” मॅक्सवेल पुढे म्हणाला, “त्यानंतर आम्ही कधीच बोललो नाही. मला माहीत होतं की या टीमसोबतचा माझा वेळ संपला आहे आणि मी मालकांनाही याबाबत माहिती दिली होती.”

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs NZ; 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर मालिका गमावू शकतो भारतीय संघ?
वयाच्या 23व्या वर्षी एका कॅलेंडर वर्षात 1000+ कसोटी धावा करणारे टाॅप-5 खेळाडू
काल सुंदर, आज मिचेल सँटनर; पुण्याचा मैदानावर किवी गोलंदाजाची कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---