भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यामध्ये आगामी 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. पण सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण बांगलादेशविरूद्ध भारताचा टी20 संघ कधी जाहीर होणार याबद्दल जाणून घेऊया.
बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान भारतीय संघात अनेक बदल होऊ शकतात. या मालिकेत रिषभ पंतला (Rishabh Pant) विश्रांती दिली जाऊ शकते. त्याचबरोबर संजू सॅमसन (Sanju Samson), जितेश शर्मा (Jitesh Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात निवड होणार असल्याची बातमी समोर येत आहे.
तत्पूर्वी या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघातील टी20 मालिकेला 6 ऑक्टोबर पासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना ग्वाल्हेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दुसरा टी20 सामना (9 ऑक्टोबर) रोजी नवी दिल्ली आणि तिसरा टी20 सामना (12 ऑक्टोबर) रोजी हैदराबादमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली मैदानात उतरताना दिसणार आहे.
शेवटच्या टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघातील दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर, टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे भारताच्या टी20 संघात आता बऱ्याच युवा खेळाडूंना संधी मिळताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025 Retention Update: किती खेळाडूंना रिटेन करता येणार?
“तू मूर्ख नाही, मी मूर्ख आहे” स्टार खेळाडूने सांगितला धोनीचा किस्सा
IPL 2025: ‘हा’ स्टार खेळाडू सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?