भारतीय संघासाठी 2024 हे वर्ष संमिश्र ठरले. या वर्षाच्या पूर्वार्धात भारतीय संघाने अनेक मोठे यश संपादन केले, ज्यामध्ये टी20 विश्वचषकाच्या विजेतेपदाचा समावेश आहे. दरम्यान उत्तरार्धात भारताने अनेक लज्जास्पद रेकाॅर्ड देखील आपल्या नावावर केले. ज्यामध्ये न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत मायदेशात पहिल्यांदाच व्हाईट वॉश होण्याचा समावेश देखील आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण भारतीय संघ 2025 ची सुरूवात कशी करेल, कोणत्या संघाविरूद्ध वर्षाचा पहिला सामना खेळेल. हे जाणून घेऊया.
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी उपस्थित आहे. मालिकेतील आतापर्यंत 4 कसोटी सामने खेळले गेले आहेत. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना (3 जानेवारी) पासून खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतील शेवटचा सामना भारतासाठी 2025 मधील पहिला सामना असेल. या मालिकेतील शेवटच्या कसोटीचा शेवटचा दिवस (7 जानेवारी 2025) असेल.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध नवीन वर्षाचा पहिला सामना खेळल्यानंतर भारतीय संघ 2025ची पहिली मालिका इंग्लंडविरूद्ध खेळणार आहे. भारत-इंग्लंड संघात (22 जानेवारी ते 12 फेब्रुवारी) दरम्यान पांढऱ्या चेंडूची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत 5 टी20, 3 वनडे सामने खेळवले जाणार आहेत. आधी टी20 मालिका, त्यानंतर (6 फेब्रुवारी) पासून वनडे मालिका सुरू होणार आहे.
या मालिकेनंतर भारतीय संघ ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’च्या (Champions Trophy 2025) रूपाने पहिली आयसीसी स्पर्धा खेळणार आहे. 2025ची ही पहिली आयसीसी स्पर्धा असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (19 फेब्रुवारी) पासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा फायनल सामना (9 मार्च) रोजी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला होता, त्यानंतर दुबई हे भारताचे तटस्थ ठिकाण म्हणून निवडण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार रोहित शर्मा, सिडनी कसोटीनंतर करणार घोषणा?
वेस्ट इंडिजच्या या खेळाडूची आश्चर्यकारक कामगिरी, एकाच चेंडूत दिल्या 15 धावा
आयपीएलमध्ये अनसोल्ड ठरलेल्या ‘या’ स्टार खेळाडूने झळकावले सलग तिसरे शतक