भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 3-0 ने धुव्वा उडवला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे आता भारतीय संघाचे जागतिक कसोटी चॅम्पियशिपच्या (WTC) फायनलमध्ये पोहोचण्याचे रस्ते कठीण झाले आहेत. या बातमीद्वारे आपण भारतीय संघाच्या जागितक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमध्ये पोहोचण्याच्या समीकरणाबद्दल जाणून घेऊया.
न्यूझीलंडविरूद्धच्या निराशाजनक पराभवानंतर भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) गुणांमध्ये 14 सामन्यांनंतर 58.33 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलिया 62.50 गुणांसह पहिल्या स्थानी आहे, तर श्रीलंका 55.56 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेपूर्वी भारत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी मजबूत स्थितीत असल्याचे दिसत होते. पण आता भारतीय संघाचा निकाल ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या बाॅर्डर-गावसकर मालिकेवर अवलंबून असणार आहे.
🚨 WTC POINTS TABLE…!!! 🚨 pic.twitter.com/rc7oGYBPkz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 3, 2024
भारत आता 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. तिथे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाला इतर संघांच्या निकालांची पर्वा न करता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी 5 पैकी किमान 4 सामने जिंकावे लागतील. जर भारतीय संघ हे करू शकला नाही तर त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; पराभवानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “आम्ही आमचे सर्वोत्तम…”
IND vs NZ; भारताचा धुव्वा उडवत न्यूझीलंडने रचला इतिहास…!
पंजाबने रिलीज केल्यानंतर ‘या’ स्टार खेळाडूने झळकावले तुफानी शतक!