---Advertisement---

ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये मोठा उलटफेर! यानिक सिनरने जोकोविचला दाखवला बाहेरचा रस्ता

Novak Djokovic Jannik Sinner
---Advertisement---

वर्षातील पहिले ग्रँड स्लॅम जिंकण्यासाठी सर्बियाचा नोवाक जोकोविच प्रमुख दावेदार होता. ऑस्ट्रेलिया ओपन 2024च्या पुरुष एकेरीचा उपांत्य सामना शुक्रवारी खेळला गेला. या सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जोकोविच याला इटलीच्या यानिक निसर याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. उपांत्य सामन्यात सिनरने 6-1, 6-2, 6-7 (6), 6-3 असा जोकोविचचा पराभव केला.

नोवाक जोकोविच यावेळी आपले 25वे ग्रँड स्लॅम जिंकेल, अशा चाहत्यांच्या अपेक्षा होता. पण शुक्रवारी (26 जानेवारी) झालेल्या उपांत्य सामन्यात त्याला निराशाजनक पराभव मिळाला. दुसऱ्यीकडे यानिक सिनर (Jannik Sinner) पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच ओपनच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. त्याचसोबत जोकोविचला ऑस्ट्रेलिया ओपनचे विक्रमी 11 ग्रँड स्लॅम देखील यावर्षी जिंकता येणार नाही.

दोघांमधील उपांत्यसामना मेलबर्न पार्कवर खेळला गेला, ज्याठिकाणी जोकोविचने मागच्या मोठ्या काळापासून एकही सामना गमावला नव्हता. पण शुक्रवारी त्याचा विजयरथ रोखला गेला. जोकोविच 2018 नंतर एकदाही मेलबर्न पार्कमध्ये पराभूत झाला नव्हता. शुक्रवारी झालेला सामना 3 तास 23 मिनिटे चालला. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा जोकोविच ऑस्ट्रेलिया ओपनच्या उपांत्य सामन्यात पराभूत झाला आहे. त्याने याआधी खेळलेले सर्व 10 उपांत्य आणि अंतिम सामने जिंकले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Australian Open (@australianopen) 

पुरुष एकेरीचा दुसरा उपांत्य सामन्यात दानिल मेदवेदेव आणि ऍलेक्झँडर ज्वेरेव यांच्यात रविवारी (28 जानेवारी) खेळला जाणार आहे. यांच्यातील विजेता खेळाडू अंतिम सामन्यात यानिक सिनरशी भिडणार आहे. (The Italian defeats 10x AO champion Novak Djokovic 6-1 6-2 6-7(6) 6-3 to reach the final)

महत्वाच्या बातम्या – 
लग्नानंतर तीन दिवसांत शोएब मलिकचे मोठे कांड, आता करियर संपल्यात जमा
क्रिकेटनंतर आता युवराज सिंग व्यावसायिक खेळाडूंकडून विशेष प्रशिक्षण घेऊन ‘या’ खेळात नशीब आजमवणार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---