दादर| शिवनेरी सेवा मंडळाच्या कब्बडी स्पर्धेला आजपासून (२९ सप्टेंबर) सुरवात होत आहे. मुंबईतील सर्वश्रेष्ठ असलेले नामांकीत असे व्यावसायिक कबड्डी संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. भारत पेट्रोलियम, महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस, मुबंई पोलीस, युनियन बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडोदा,सेंट्रल बॅंक, मुंबई बंदर व सेंट्रल रेल्वे या संघांचा यात समावेश आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने कब्बडी रसिकांना प्रो कब्बडी स्पर्धा गाजवलेले काशीलिंग अडके, नितीन मदने, निलेश शिंदे, नितीन मोरे, पंकज मोहिते, महेंद्र राजपूत, व सुशांत साईल या खेळाडूंचा खेळ पाहता येईल.
महिला गटात शिवशक्ती, डॉ शिरोडकर, अमरहिंद, विश्वशांती असे सर्वोत्तम संघ विजयाला गवसणी घालण्यासाठी क्रीडांगणात उतरतील. कॉलेज, महिला, व्यवसायिक श्रेणी अ आणि विशेष व्यवसायिक अश्या चार गटात मिळून जवळपास १०९ संघ सहभागी होणार आहेत.
२९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०१९ दरम्यान दादर पूर्व येथील भवानी माता क्रीडांगणावर आयोजित केलेल्या या स्पर्धेत कब्बडी खेळाची मेजवानीच क्रीडारसिकांसाठी असणार आहे. मातीच्या दोन मैदानावर ही स्पर्धा होणार असून भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘रेकॉर्ड ब्रेकर’ परदीप नरवाल काही थांबेना, केले हे खास विश्वविक्रम
–मराठमोळ्या पंकज मोहितेची प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये मोठी कामगिरी, केला हा पराक्रम