मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने प्रतिवर्षी जवळपास ६० ते ७० संलग्न संस्थाच्यावतीने विविध गटाच्या स्पर्धा भरवण्यात घेण्यात येतात. यासाठी यंदा पंच शिबीर आचल पॅलेस, नागांव, अलिबाग जिल्हा रायगड येथे घेण्यात आले. या शिबिराचा लाभ मुंबईच्या ७० पंचांनी घेतला.
कबड्डी स्पर्धेत काहीवेळा नियमांचा वेगळा अर्थ लावून निर्णय दिले जातात, त्यामुळे गोंधळ निर्माण होते. त्यामुळे पंचांमध्ये एकसूत्रीपणा असावा, खेळाच्या तसेच क्रीडाप्रेमी प्रेक्षकांच्या दृष्टीने कबड्डी सामने निर्दोषपणे खेळवण्यात यावेत म्हणून पंचाना कबड्डी नियमानविषयी मार्गदर्शन करण्यासाठी या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येते. तसेच राज्य व अखिल भारतीय स्तरावरील सामन्यावर देखील मुंबईच्या पंचाची नेमणूक करण्यात येते.
प्रो-कबड्डीमुळे हा खेळ घराघरात पोहचला आहे. त्यामुळे पंचाना सतर्क रहाणे महत्वाचे आहे, कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी प्रो कबड्डीतील काही नियम बदलले असले तरी जिल्हा, राज्य व अखिल भारतीय संघटनाच्या होणाऱ्या स्पर्धेत नियम हे अखिल भारतीय हौशी कबड्डी संघटनेच्या नियमाप्रमाणेच वापरले जातील, असे अखिल भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या पंच मंडळाचे समन्वयक विश्वास मोरे यांनी सांगितले.
या शिबिरातील पंचाना अखिल भारतीय, राज्य व जिल्हास्तरिय स्पर्धेत काम करताना नियमांच्या बाबतीत कोणतीही अडचण येऊ नये. सामने एकाच नियमाने खेळविण्यात यावे म्हणून या शिबरातील सामनाधिकाऱ्यांचे विश्वास मोरे, मनोहर इंदुलकर यांनी प्रबोधन केले.
याप्रसंगी अखिल भारतीय हौशी कबड्डी संघटनेच्या पंच मंडळाचे समन्वयक व मुंबई शहर कबड्डी असो.चे प्रमुख कार्यवाहक विश्वास मोरे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंच समितीचे माजी अध्यक्ष मनोहर इंदुलकर, व मुंबई शहर पंच मंडळाचे अध्यक्ष मेहेंद्र हळदणकर पंच सेक्रेटरी सूर्यकांत देसाई ,खजिनदार शुभांगी पाटील, तसेच सर्व मुंबई शहराचे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
या शिबिराची संपूर्ण व्यवस्था आचल पॅलेस हॉटेल यांनी केली. आयत्यावेळी ठरलेल्या या शिबिरासाठी कमी वेळेत खूप चांगल्याप्रकारे व्यवस्था करण्यात आली होती. उत्तम भोजनव्यवस्था आचल पॅलेस, नागावं, अलिबाग यांनी केली होती. शिबिरानिमित्ताने सर्व पंच एकत्र येतात त्यामुळे सर्व नवीन व जुने पंचाची ओळख होते. शिबिरा व्यतिरिक्त वेळेत सर्व पंचांनी मज्जा-मस्ती करत आनंद लुटला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–परदीप नरवालने तिसऱ्यांदा हे खास द्विशतक पूर्ण करत रचला इतिहास
–२००७ टी२० विश्वचषकाच्या फायनलचा हिरो सध्या करतो काय?