भारताचा २२ वर्षीय युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने स्वतःविषयी अनेक मोठे खुलासे केले आहेत. पृथ्वी शॉच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आहेत. तो सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा सर्वात कमी वयात कसोटी शतक करणारा फलंदाज आहे. तसेच पदार्पणच्या कसोटी सामन्यात शतक करण्याचा विक्रमदेखील त्याच्या नावावर आहे. त्याच्याविषयी या गोष्टी अनेकांना माहीती आहेत, पण त्याच्या क्रिकेटची सुरुवात कशी झाली, याविषयी अद्याप अनेकांना कसलीच माहिती नाही. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात शॉने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीविषयी माहिती दिली.
द कपिल शर्मा शोमध्ये भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ प्रमुख पाहूण्यांच्या रूपात आले होते. कार्यक्रमात कपिल शर्माने शॉला प्रश्न विचारला की, त्याने केव्हा निर्णय घेतला की, त्याला एक क्रिकेटपटू बनायचे आहे. यावर शॉकडून उत्तर आले की, त्याच्या वडिलांनी फक्त तीन वर्षाचा असताना त्याला क्रिकेट अकादमीत दाखल केले होते. शॉ म्हणाला की, “मी प्लास्टिक बॉलने सुरुवात केली होती आणि एक दीड वर्षानंतर टेनिस बॉलवरून खेळू लागलो होतो.”
लहानपणी क्रिकेट समजत नव्हते
कार्यक्रमात पुढे कपिल शर्माने विचारले की, त्याला एवढ्या कमी वयात क्रिकेट समजायचे का ? यावर शॉ म्हणाला की, “नाही मला हा खेळ समजत नव्हता. वडील जे काही सांगायचे, मी तेच करायचो. जेव्हा मी ६ किंवा ७ वर्षाचा होतो, तेव्हा मला हा खेळ समजू लागला. माझ्या वडिलांना क्रिकेट खूप आवडायचे. त्यावेळी आमच्या गल्लीत फक्त एकच टीव्ही होता, तर माझे वडील मला त्याठिकाणी घेऊन जायचे. ते सचिन (तेंडुलकर) सरांचे खूप मोठे चाहते होते, जे त्यावेळी कारकिर्दीच्या शिखरावर होते, जे आजही आहेत. तर जेव्हा कधी सचिन बाद व्हायचे, तेव्हा वडील घरी यायचे. क्रिकेटसाठी त्यांची आवड इतकी होती की, मी फक्त क्रिकेट खेळावे असे त्यांना वाटायचे.”
शॉने भारताच्या १९ वर्षाखीलील संघासोबत चांगली कामगिरी केली आहे. १९ वर्षाखालील संघाचा तो कर्णधार देखील होता. कार्यक्रमात शॉने इतरही अनेक विषयांवर खुलासा केला आहे. तसेच शिखर धवनसोबत त्याची जुगलबंदी देखील पाहायला मिळाली.
महत्वाच्या बातम्या –
गब्बरने सांगितले निराशेतून बाहेर येण्याचे गुपित; म्हणाला, “या गोष्टी आयुष्यात…”
पहिल्या सामन्यात कोठे शिंकली माशी? जाणून घ्या भारताच्या पराभवाची चार कारणे
दक्षिण आफ्रिका-भारत वनडे मालिका नसेल आयसीसी वनडे सुपर लीग स्पर्धेचा भाग; काय आहे कारण? घ्या जाणून
व्हिडिओ पाहा –






