---Advertisement---

लहान मुलांनी लुटला श्रीलंकेच्या खेळाडूंसोबत खेळण्याचा आनंद

File Photo
---Advertisement---

पुणे, २८ ऑक्टोबर २०२३: युनिसेफ व आयसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेट ४ गुड असा उपक्रम राबविला जातो. त्या अंतर्गत आज पुण्यातील एमसीए च्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे पुणे जिल्ह्यातील काही शाळांमधील मुलांनी श्रीलंकेच्या खेळाडूंसह एकत्र क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

या उपक्रमाचा मुख्य हेतू स्त्री पुरूष समानता साधणे तसेच जीवन कौशल्य शिकवणे हा होता. त्यामुळे या उपक्रमात प्रत्येकी २५ मुले व मुलींनी सहभाग नोंदवला होता. हि मुले हिंजेवडी, मान, म्हाळुंगे, रांजणे या भागातील शाळांमधून आली होती. आस्मी लोखंडे ही सहाव्या इयत्तेतील विदर्थिनी यावेळी म्हणाली की, क्रिकेट पटू बरोबर खेळणे हा अत्यंत मजेशीर अनुभव होता. खेळाडूंकडून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. भविष्यात संधी मिळाली तर नक्की क्रिकेट खेळू.

वन डे फॉर चिल्ड्रन
भारत विरुध्द श्रीलंका ही २ नोव्हेंबर रोजीचा सामना मुलांसाठी समर्पित करण्यात आला आहे. या सामन्या द्वारे युनीसेफचे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांसाठीचे काम याबाबत जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. त्यानिमित्त वानखेडे स्टेडियम निळ्या रंगामध्ये सजविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड, युनीसेफचे पुनीत मित्तल आदी मान्यवर उपस्थित होते. (The kids enjoyed playing with the Sri Lankan players)

महत्वाच्या बातम्या – 
ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत हरियाणाच्या तविश पहवा याला दुहेरी मुकुट
नेदरलँड्सचा कॅप्टन ऍडवर्ड्स ‘या’ बाबतीत सर्वात भारी! बांगलादेशविरुद्ध केला मोठा विक्रम 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---