वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (28 ऑक्टोबर) डबल हेडर सामने आयोजित केले गेले होते. दिवसातील दुसरा सामना नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यात कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर खेळवला गेला. नेदरलँड्स या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. संघातील इतर फलंदाज अफेक्षित खेळी करू शकले नाहती. मात्र, कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने अर्धशतकी खेळी केली आणि खास विक्रम नावावर केला.
स्कॉट ऍडवर्ड्स (Scott Edwards) वनडे विश्वचषक 2023 नेदर्लंड्ससाठी कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. पण शनिवारी (28 ऑक्टोबर) त्याने विश्वचषकात दुसऱ्यांदा कर्णधारपदाला साजेशी खएळी केली. बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात ऍडवर्ड्सने 68 षटकांमध्ये 89 धावा केल्या. यात 6 चौकारांचा समावेश होता. ऍडवर्ड्सकडून या अर्धशतकी खेळीचे रुपांतर शतकात होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, मुस्तफिझूर रहमान याच्या गोलंदाजीवर त्याने मेहिदी हसन मिराझ याच्या हातात झेल दिली आणि विकेट गमावली.
दरम्यान, ऍडवर्ड्स या खेळीनंतर नेदरलँड्ससाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50+ धावांची खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वनडे क्रिकेटमधील 15 वेळा अशी खेळी केले आहे. यापूर्वी रायन टेन डोशाटे याने आणि स्कॉट ऍडवर्ड्स 14 वनडे डावांमध्ये 50+ धावा केल्या आहेत. पण शनिवारी ऍडवर्ड्सने त्याला मागे टाकले. यादीत तिसऱ्या क्रमांका टॉम कूपर आहे, ज्याने 13 वेळा ही कामगिरी केली आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या कमाल ओडाऊन आणि एरिक स्वार्झिन्स्की यांनी प्रत्येकी 10-10 वनडे डावांमध्ये 50+ धावा केल्या आहेत.
नेदरलँड्ससाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50+ धावा करणारे फलंदाज
15 – स्कॉट एडवर्ड्स
14 – रायन दहा डोशाटे
13 – टॉम कूपर
10 – कमाल ओडाऊन
10 – एरिक स्वार्झिन्स्की
दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात नेदरलँड्स संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आला. मात्र, बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर त्यांना 229 धावांवर समाधान मानावे लागले. डावातील शेवटच्या चेंडूवर नेदरलँड्स संघ सर्वबाद झाला. बांगलादेशसाठी महेदी हसन, मुस्तफिझूर रहमान, अस्कीन अहमद आणि शोरिफूल इस्लाम यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. कर्णधार शाकीब अल हसन यानेही एक विकेट घेतली. (Scott Edwards has become the highest half-century scorer for Netherlands in ODI cricket)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
नेदरलँड्स – विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, वेस्ली बॅरेसी, कॉलिन एकरमन, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), बास डी लीडे, सीब्रँड एंजेलब्रेच, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन
बांगलादेश – तंजीद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, मेहिदी हसन मिराज, महेदी हसन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरिफुल इस्लाम
महत्वाच्या बातम्या –
रचिनचा रंग कायम! ऑस्ट्रेलियन गोलंदाजी फोडत ठोकले दुसरे वर्ल्डकप शतक
ऑस्ट्रेलियाने मागील तीन सामन्यात बॉल पाठवलाय ढगात, ठोकले तब्बल इतके षटकार