वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (28 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 388 धावा उभ्या केल्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडसाठी डेरिल मिचेल, रचिन रवींद्र व जिमी निशाम यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना 5 धावांनी पराभूत व्हावे लागले. ऑस्ट्रेलियाचा हा सलग चौथा विजय ठरला तर, न्यूझीलंडला आपल्या सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावे लागले.
AUSTRALIA WON THE MATCH BY JUST 5 RUNS….!!! pic.twitter.com/ix70nTD71M
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 28, 2023
धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय डेव्हिड वॉर्नर व ट्रेविस हेड यांनी चुकीचा ठरवला. या जोडीने केवळ 19.1 षटकात 175 धावांची मोठी भागीदारी रचली. वॉर्नरने 81 धावांची खेळी केली. तर, हेडने आपल्या पहिल्याच विश्वचषक सामन्यात 109 धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल, जोस इंग्लिस व पॅट कमिन्स यांनी आक्रमक फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला 388 पर्यंत पोहोचवले.
या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडसाठी पहिले दोन गडी लवकर बाद झाले. त्यानंतर डेरिल मिचेल याने अर्धशतकी खेळी केली. युवा अष्टपैलू रचीन रवींद्र याने या विश्वचषकातील आपले दुसरे शतक पूर्ण करत न्यूझीलंडला सामन्यात कायम ठेवले. त्याने 116 धावा केल्या. अखेरच्या टप्प्यात जमिनी शाम याने शर्तीचे प्रयत्न करत अर्धशतक ठोकले. मात्र, एक चेंडू शिल्लक असताना तो धावबाद झाल्यामुळे न्यूझीलंड संघाला पाच धावांनी पराभूत व्हावे लागले.
(Australia Beat Newzealand By 5 Runs In ODI World Cup Head Rachin Hits Century)
हेही वाचा-
मॅक्सवेलने मारला World Cup 2023चा सर्वात लांब षटकार, तुटला ‘या’ भारतीयाचा रेकॉर्ड, पाहा अफलातून व्हिडिओ
ट्रेविस हेडने रचला मोठा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला चौथा खेळाडू