---Advertisement---

आयपीएल २०२०चा सुपरस्टार ‘वरुण चक्रवर्ती’ सोशल मीडियावरही ठरला सुपर, एका फोटोने…

On: बुधवार, नोव्हेंबर 18, 2020 11:34 AM
---Advertisement---

मिस्ट्री स्पिनर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वरुण चक्रवर्ती मंगळवारी संध्याकाळी अचानक सोशल मीडियावर ट्रेंड होण्यास सुरवात झाली. याला कारण ठरला तो म्हणजे दक्षिण भारतीय चित्रपटाचा सुपरस्टार विजय. खरं तर वरुण हा फिल्मस्टार विजयचा खूप मोठा चाहता आहे आणि मंगळवारी त्याने विजयसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर, तो ट्विटरवर ट्रेंड होण्यास सुरवात झाली.

मंगळवारी कोलकाताचा स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्ती याने दक्षिणी सिने अभिनेता विजयच्या कार्यालयात जाऊन त्याची भेट घेतली होती. वरुण हा विजयचा मोठा चाहता आहे. त्याच्या खांद्यावर विजयच्या एका चित्रपटाचा टॅट्युदेखील आहे. वरुणने फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. तसेच दोन सुपरस्टार एकाच फोटोत पाहायला मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.

मिस्ट्री वरून 7 प्रकारे फिरवतो चेंडू

वरुण गोलंदाजी करताना 7 प्रकारे चेंडू टाकू शकतो. या 29 वर्षीय गोलंदाजाला त्याच्या वेगवेगळ्या शैलीमुळे मिस्ट्री फिरकीपटू म्हटले जाते. गेल्या वर्षी तमिळनाडू प्रीमियर लीगमधून वरुण चर्चेत आला होता. या लीगमध्ये त्याने 5 पेक्षा कमी इकॉनॉमी रेटने धावा दिल्या होत्या. यासह त्याने नऊ गडी बाद केले.

आयपीएलमध्ये झाली प्रथमच निवड

तमिळनाडू प्रीमियर लीग मधील कामगिरीनंतर आयपीएल 2019 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला 8.4 कोटी रुपयांत विकत घेतले. मात्र, त्यानंतर त्याला फक्त एक सामना खेळण्याची संधी मिळाली. जेव्हा पंजाबने वरुणला सोडले तेव्हा कोलकाताने त्याला आयपीएल 2020 च्या लिलावात चार कोटी रुपयांना विकत घेतले आणि आयपीएलमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली.

वरुण चक्रवर्तीने आयपीएल 2020 हंगामात कोलकाता नाईट राईडर्सकडून खेळताना 13 सामन्यांत 17 बळी मिळवले. ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यासाठी देखील वरुणची निवड झाली होती. मात्र दुखापतीमुळे त्याची ही संधी हुकली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---