हैद्राबाद। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(2 मार्च) पहिला वनडे सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 237 धावांचे आव्हान ठेवले आहे.
मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन शून्य धावेवरच बाद झाला. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीेने डावा सांभाळला. परंतू खेळपट्टीवर स्थिर झाल्यानंतर हे दोघेही बाद झाले. त्यापाठोपाठ अंबाती रायडूही लगेचच बाद झाला. त्यामुळे भारताची आवस्था 4 बाद 99 धावा अशी झाली.
विराटला 44 धावांवर असताना ऍडम झम्पाने पायचीत बाद केले. त्यामुळे जवळजवळ 6 वर्षांनी विराट मायदेशात वनडेमध्ये पहिल्यांदा पायचीत बाद झाला आहे.
तो याआधी मायदेशात 13 ऑक्टोबर 2013 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच वनडे क्रिकेटमध्ये पायचीत बाद झाला होता. पुण्यात झालेल्या या सामन्यात वॉटसनने त्याला पायचीत बाद केले होते. म्हणजेच विराट तब्बल 41 डावांनंतर पायचीत बाद झाला आहे.
विराट ज्यावेळी बाद झाला त्यावेळी पंचानी त्याला नाबाद दिले होते. पण ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेतला. ज्यात विराट बाद असल्याचे स्पष्ट दिसले. त्यामुळे विराटला परतावे लागले. विराटने रोहितबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली.
विराट कोहली गेल्या १७ डावात असा बाद झाला
पायचीत (आज)
झेलबाद
झेलबाद
झेलबाद
झेलबाद
झेलबाद
झेलबाद
झेलबाद
झेलबाद
झेलबाद
झेलबाद
झेलबाद
झेलबाद
झेलबाद
झेलबाद
झेलबाद
झेलबाद#म #मराठी #CWC19 #TeamIndia #ViratKohli pic.twitter.com/fLTbRUDqgL— Sharad Bodage (@SharadBodage) March 2, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–विराटबरोबर २००८च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळलेले खेळाडू सध्या काय करतात, वाचा
–बीसीसीआयने विंग कमांडर अभिनंदन यांना दिली क्रमांक १ ची जर्सी
–आणि संकटात सापडलेल्या केएल राहुलला केली राहुल द्रविडने मदत