ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजांच्या कामगिरीवर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने तीन प्रमुख गोलंदाजांचा विशेष उल्लेख केला आहे, ज्यांची कामगिरी फारशी चांगली नव्हती. आकाश चोप्राने प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांच्यावर प्रतिक्रिया दिली.
विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दोन विकेट्स राखून रोमहर्षक पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावून 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 19.5 षटकांत 8 विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने जबरदस्त खेळी खेळली आणि 42 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या.
त्याचवेळी भारतीय संघाच्या गोलंदाजांची कामगिरी फारशी चांगली नव्हती. मुकेश कुमार (Mukesh Kumar) याच्याशिवाय इतर गोलंदाजांना तितकी छाप पाडता आली नाही. आकाश चोप्रा (Akash Chopra) याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एका संवादादरम्यान सांगितले की, “अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याची सुरुवात चांगली झाली होती पण त्याचा फिनिश चांगला नव्हता. त्याने पहिल्या दोन षटकात फक्त सात धावा दिल्या पण शेवटच्या दोन षटकात जवळपास 30-40 धावा दिल्या. प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याची सुरुवात खराब झाली आणि त्याचा शेवट तितकाच खराब झाला. त्याला एक विकेट मिळाली ज्या दोन मिळायला हव्या होत्या, कारण रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याने झेल सोडला. रवी बिश्नोईने सातत्यपूर्ण गोलंदाजी केली नाही आणि दोन झेल सोडल्याशिवाय एक धावबादही त्याच्याकडून हुकला.”
या सामन्यात प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली पण त्यांनी खूप धावा दिल्या. अर्शदीप सिंगनेही 40 हून अधिक धावा दिल्या. (The legend raised questions on the performance of the Indian bowlers Said Arshdeep Singh beginning)
म्हत्वाच्या बातम्या
‘तो’ पुन्हा अडचणीत! वर्ल्डकप विजेता भारतीय खेळाडूविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल, वाचा संपूर्ण प्रकरण
सूर्या… इतिहास घडवणारा कॅप्टन! ऑस्ट्रेलियाविरुद्ध बनवला आजपर्यंत कुणालाच न जमलेला विक्रम, घ्या जाणून