कसोटी क्रिकेट… हे नाव ऐकल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला डोक्यात चटकन येते ते म्हणजे १४४ वर्षांचा इतिहास लाभलेला सर्वात मोठा क्रिकेट प्रकार. तसं पाहिलं तर सध्या ५ दिवसांचा एक कसोटी सामना खेळला जातो. परंतु कसोटी क्रिकेटच्या सुरुवातीला एक कसोटी सामना ६ दिवस खेळला जात असायचा. या १४३ वर्षांच्या इतिहासात एक मनोरंजक घटना घडली होती. ती घटना १९३९ साली घडली होती, ज्यावेळी कसोटी क्रिकेटचा सर्वात मोठा सामना (The longest cricket test match in history) खेळण्यात आला होता. तो सामना तब्बल १२ दिवस खेळला गेला होता. खरंतर त्या कसोटी सामन्याला ‘टाईम लेस कसोटी सामना’ (Timeless Test Match) असे म्हटले गेले होते.
३ मार्च ते १४ मार्च १९३९ यादरम्यान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघात तो कसोटी सामना खेळण्यात आला होता. डर्बन येथे खेळण्यात आलेल्या त्या सामन्यात एकूण १९८१ धावा करण्यात आल्या होत्या. आता तुम्ही म्हणाल की एवढ्या धावा कशा काय?, तर त्या धावा दोन्ही संघांनी मिळून केल्या होत्या. त्या सामन्यात २ दिवस खेळाडूंना विश्रांतीसाठी देण्यात आले होते, तर १ दिवस हा पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेला होता. म्हणजेच तो सामना ९ दिवस खेळला गेला होता.
असा होता तो ‘टाईम लेस कसोटी सामना’ (Timeless Test Match)
दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी २ फलंदाजांच्या शतके आणि ३ फलंदाजांच्या अर्धशतकांच्या मदतीने ५३० धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव तीन दिवस चालला. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने आपला पहिला डाव खेळण्यास सुरुवात केली. परंतु ते केवळ ३१६ धावांवरच गारद झाले होते. इंग्लंडच्या कोणत्याच फलंदाजाला पहिल्या डावात शतक साजरे करता आले नाही. इंग्लंडने ३१६ धावा जोडण्यासाठी २ दिवस घेतले. पाचव्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांना त्रास द्यायला सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव ४८१ धावांवर संपला.
इंग्लंड संघाला विजयासाठी मिळाले होते ६९६ धावांचे आव्हान
दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत ५ विकेटच्या मोबदल्यात ६५४ धावा केल्या. इंग्लंड संघाच्या दुसऱ्या डावात एका फलंदाजाने द्विशतक ठोकले, तर दोन फलंदाजांनी शतक साजरे केले. हा कसोटी सामन्याचा १२ वा दिवस होता. जेव्हा १२ वा दिवस संपला, तेव्हा इंग्लंडला विजयासाठी ४२ धावांची आवश्यकता होती. परंतु वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंड संघाने सर्वांच्या परवानगीने सामना पंचांना अनिर्णित घोषित करण्याची अपील केली. खरंतर इंग्लंडच्या खेळाडूंना जहाजामार्फत समुद्रमार्गाने आपल्या देशात परतायचे होते. अशामध्ये इंग्लंडने १४ मार्चला खेळ संपल्यानंतर सामना मध्येच सोडत पुन्हा परतण्याचा निर्णय घेतला. कारण इंग्लंड संघाला सामना जिंकायचा असता, तर त्यांना दुसऱ्या दिवशीही फलंदाजी करावी लागली असती. अशामध्ये त्यांना आपल्या जहाजाचा त्याग करावा लागला असता. शेवटी हा ‘टाईम लेस कसोटी सामना’ संपला. परंतु या सामन्याला कसोटी इतिहासातील सर्वात मोठा सामना म्हणून कायमची ओळख मिळाली.
पहिला दिवस- दक्षिण आफ्रिका फलंदाजी- २ बाद २२९
दुसरा दिवस- दक्षिण आफ्रिका फलंदाजी- ६ बाद ४२३
तिसरा दिवस- विश्रांती
चौथा दिवस- दक्षिण आफ्रिका सर्वबाद ५३०, इंग्लंड- १ बाद ३५
पाचवा दिवस- इंग्लंड ७ बाद २६८
सहावा दिवस- दक्षिण आफ्रिका दुसरा डाव- ३ बाद १९३
सातवा दिवस- इंग्लंड ० वर ०
आठवा दिवस-इंग्लंड दुसरा डाव १ बाद २५३
नववा दिवस- पावसामुळे खेळ झाला नाही
दहावा दिवस- विश्रांती
अकरावा दिवस- इंग्लंड दुसरा डाव३ बाद ४९६
बारावा दिवस- इंग्लंड दुसरा डाव ५ बाद ६५४
https://twitter.com/ICC/status/969727807600320512?s=20
https://twitter.com/ICC/status/837573260527153153
https://twitter.com/MarathonPlay/status/1240858102464823297
संक्षिप्त धावफलक-
दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव- ५३०, व्हॅन डर बिजिल (१२५ धावा) आणि डडले कोर्स (१०३)
इंग्लंड संघाचा पहिला डाव- ३१६, लेस एम्स (८४ धावा)
दक्षिण आफ्रिका संघाचा दुसरा डाव- ४८१, ऍलन मेलविले (१०३ धावा)
इंग्लंड संघाचा दुसरा डाव- ५ बाद ६५४, पॉल गिब (१२० धावा) आणि कर्णधार व्हॅली हॅमंड
(१४० धावा) आणि बिल एड्रिच (२१९ धावा)
निकाल- सामना अनिर्णित (करारांतर्गत)
ट्रेंडिंग घडामोडी-
भारतीय क्रिकेटसाठी २० जून का आहे सर्वात खास? घ्या जाणून
‘मागच्या वर्षी डावलले पण यावर्षी टी-२० विश्वचषकात चहल गेम चेंजर ठरणार’, माजी दिग्गजांचे भाकीत






