आज पासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेची सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात यजमान संघ पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड हे संघ समोरासमोर असतील. तत्पूर्वी पाकिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद रिजवान याने चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये त्यांच्या संघाच्या अडचणींवर भाष्य केले आहे.
मोहम्मद रिजवानच म्हणणं आहे की, पाकिस्तानचा संघ दबावाने तुटून जातो या त्यांच्या कमजोरीवर काम करण्याची त्यांना गरज आहे. मोहम्मद रिजवानने रिपोर्टरच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले, जर तुम्ही आमच्या मागच्या सामन्यातील खेळी पाहिली तर आमचा संघ दबाव आल्यावर नीट खेळत नाही. पण आता आम्हाला आमच्या चुकींवर काम करण्याची गरज आहे.
रिजवान नंतर म्हणाला जर तुम्ही मागच्या दहा वर्षांतील आमचं रेकॉर्ड पाहिले तर , आम्ही दबाव आल्याने खेळण्यात चुकतो. तसेच आत्ता आमच्या संघाने खेळात चांगलं प्रदर्शन केलं आहे. याशिवाय टेस्ट रँकिंग मध्ये आम्ही पहिल्या क्रमांकाचा संघ आहोत.
पण आता या सवयीला सुधारण्याची आम्हाला खूप गरज आहे. मला आशा आहे की ,यावेळेस तीच गोष्ट पुन्हा आमच्याकडून घडली जाणार नाही. मागच्या काही दिवसात पाकिस्तानला न्यूझीलंड विरुद्ध ट्राय सिरीजचा अंतिम सामना खेळताना पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा न्युझीलँडने पाकिस्तानला 5 विकेट्स ने हरवले होते.
यावर्षी पाकिस्तान गतविजेता संघ म्हणून स्पर्धेत उतरत आहे. पाकिस्तानने 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तेव्हा अहमद शहजाद च्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननी भारताला अंतिम सामन्यात हरवले होते. आता हे बघणं उत्सुकतेच असणार आहे की घरच्या मैदानावर पाकिस्तान स्पर्धा कशी खेळेल?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान संघाचे स्क्वाड
फखर जमान ,बाबर आझम,कामरान गुलाम, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक/ कर्णधार), सलमान आगा, तैय्यब ताहीर,खुशदिल शाह, फहीम अशरफ,शाहीन आफ्रिदी,नसीम शाह,अबरार अहमद, हारीस रऊफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान सऊद शकील.
हेही वाचा
भारतासमोर पाकिस्तानची शरणागती? कराचीत भारतीय ध्वज फडकला!
बाबर आझमला मागे टाकत शुबमन गिलनं गाठलं शिखर, आयसीसी क्रमवारीत बंपर फायदा
पाकिस्तानच्या गोलंदाजांना सडेतोड उत्तर देण्यासाठी विराट-रोहित सज्ज!