श्रीलंकेच्या संघाने टी२० मालिकेत चांगले पुनरागमन केले आहे. पहिल्या सामन्यात संघाचा पराभव झालेला. परंतु, संघाने दुसरा सामना ४ गड्यांनी जिंकून मालिका बरोबरीत आणली. वनडे मालिकेतील १-२ अशा पराभवानंतर टी२० मालिका जिंकण्यासाठी संघ जोरदार प्रयत्न करीत आहे. मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना गुरुवारी (२९ जुलै) खेळला जाईल. मात्र, तत्पूर्वी श्रीलंका संघ एका विशिष्ट कारणामुळे अडचणीत आहे.
श्रीलंकेतील एका प्रमुख वृत्तपत्रानुसार, एका अष्टपैलू खेळाडूच्या व्यवस्थापकाने दुसर्या खेळाडूच्या निवडीवर परिणाम करण्याचा प्रयत्न केला. श्रीलंका संघ व्यवस्थापनाच्या हवाल्याने त्या वृत्तामध्ये लिहिल्याप्रमाणे, ‘तो व्यवस्थापक खूप त्रास देत आहे. आम्ही भारताविरुद्धच्या दुसर्या टी२० साठी संघात एक प्रतिभावान अष्टपैलू खेळाडूचा समावेश करु शकलो नाही. हे फक्त त्या व्यवस्थापकामुळे होऊ शकले नाही. आम्हाला त्या खेळाडूस संघात समाविष्ट करायचे आहे. परंतु, व्यवस्थापकाच्या प्रभावामुळे उलटा निर्णय घ्यावा लागला. व्यवस्थापकाने स्वत:च्या फायद्यासाठी निवड प्रभावित करण्याचा प्रयत्न केला.’
वादात राहिला आहे व्यवस्थापक
यापूर्वीही तथाकथित व्यवस्थापक वादग्रस्त ठरला आहे. लंका प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात तो आपल्या अर्जित खेळाडूंकडून दहा टक्के कमिशन घेतल्यामुळे चर्चेत आला होता. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या संघाला दुसरा टी२० जिंकून दिलासा मिळाला आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषक सामने होणार आहेत. संघाला पात्रता फेरीत खेळावे लागेल. त्याआधी, भारताविरुद्धची ही टी२० मालिका जिंकल्यास त्यांना मानसिक फायदा होईल.
श्रीलंका उतरणार तयारीनिशी
तिसऱ्या सामन्यासाठी श्रीलंका आपला सर्वोत्तम संघ घेऊन मैदानात उतरेल. फलंदाजीमध्ये अविष्का फर्नांडो, धनंजय डी सिल्वा व अष्टपैलू चमिका करूणारत्ने यांच्यावर संघाची मदार असेल. तर, गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज दुष्मंता चमिरा, लेगस्पिनर वनिंदू हसरंगा आणि अकीला धनंजय यांच्यावर प्रमुख जबाबदारी असेल. प्रथमच नेतृत्व करत असलेल्या कर्णधार दसून शनाका हा विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
जेष्ठ पत्रकाराने टोकियो ऑलिंपिकमधील कोरियन खेळाडूंबद्दल केली वंशद्वेषी टिप्पणी, झाली ‘ही’ कारवाई
बटरफ्लाय हीट- २ मध्ये दुसरा क्रमांक पटकावूनही उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात साजन प्रकाश अपयशी
Video: मॅट पार्कीसनची पुन्हा एकदा कमाल, तब्बल ११ अंशानी चेंडू वळवत यष्ट्या केल्या उद्ध्वस्त