यंदाच्या आयपीएल (IPL 2025) हंगामातील 32वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Rajasthan Royals vs Delhi Capitals) संघात खेळला जात आहे. दोन्ही संघ दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम वरती आमने-सामने आहेत. यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने राजस्थानसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
राजस्थानने टॉस जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. दरम्यान दिल्लीने मर्यादित 20 षटकांमध्ये 5 गडी गमावून 188 धावा केल्या. दिल्लीसाठी सलामीला आलेल्या जेक फ्रेझर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी संघाला हवी तशी सुरुवात करून दिली नाही. दिल्लीने 34 या धावसंख्येवर दोन विकेट्स गमावल्या. सलामीवीर मॅकगर्कला राजस्थानचा वेगवान गोलंदाज चोप्रा आर्चरने 9 धावांवर पवेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्यानंतर करून नायर फलंदाजीसाठी मैदानात उतरला परंतु, तो 3 चेंडू खेळून 0 धावसंख्येवर धावबाद होऊन तंबूत परतला.
दिल्लीसाठी अभिषेक पोरेलने 49 धावांची खेळी केली. तो फिरकीपटू वानिंदू हसरंगाच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीत 5 चौकारांसह 1 षटकार लागला. यष्टीरक्षक केएल राहुलने 38 धावांची खेळी केली. तर कर्णधार अक्षर पटेलने 34 धावा केल्या. शेवटी संघाचा डाव सावरत ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 34 धावांची शानदार खेळी केली. तर आशुतोष शर्माने 15 धावा केल्या.
राजस्थानसाठी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर फिरकीपटू महिश तीक्षणा आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 1- 1 विकेट आपल्या नावावर केली. आता राजस्थान राॅयल्सचा संघ 189 धावा करण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणेदेखील महत्वाचे ठरेल.
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन-
राजस्थान रॉयल्स- यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरन हेटमायर, नितीश राणा, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षणा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे
दिल्ली कॅपिटल्स- जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा