क्रिकेटच्या विश्वात पहिल्यांदाच एक आश्चर्यकारक सामना खेळला गेला, जो स्पर्धेचा एक भाग आहे. ही स्पर्धा ‘द हंड्रेड’ असून यामध्ये फक्त 100 चेंडूंचा सामना आयोजित केला जात आहे. यापूर्वी 6 चेंडूचा षटक असा नियम होता, परंतु या सामन्यात तसे काहीच नव्हते. या सामन्यात एक गोलंदाज सलग 7 चेंडू टाकू शकतो किंवा 10 चेंडू टाकू शकतो. याला पाच चेंडूंचा षटक म्हटले जाऊ शकते, परंतु द हंड्रेड या स्पर्धेमध्ये याला फाईव्ह असे म्हटले आहे.
याच नवीन नियमासह बुधवारी (21 जुलै) पहिला शंभर चेंडूंचा सामना महिला संघांमध्ये खेळला गेला आहे. या स्पर्धेतील पहिला सामना ओव्हल इन्विन्सिबल्स महिला संघ आणि मँचेस्टर ओरिजिनल्स महिला संघामध्ये झाला. (The match, played for the first time in the history of cricket, was played between the Oval Invinsibles and the Manchester Originals)
या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर मँचेस्टर ओरिजिनल्स महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या संघाने 100 चेंडूमध्ये 6 गडी बाद 135 धावा केल्या. मँचेस्टर संघाकडून लिझेल लीने 39 चेंडूंत 42 धावा केल्या. ज्यात 6 चौकारांचा समावेश होता, तर भारतीय महिला फलंदाज हरमनप्रीत कौरने 16 चेंडूत 29 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यामध्ये 6 चौकारांचा समावेश होता. जॉर्जी बॉयसने 21 धावा केल्या. त्याचबरोबर कर्णधार केट क्रॉसने 4 चेंडूत 12 धावा केल्या, तर एम डू प्रीझ आणि सोफी इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 10-10 धावा केल्या. ओव्हल संघाकडून ताश फॅरेंटने 20 चेंडूत 3 गडी बाद केले, तर मारिजाणे कॅपने 2 गडी बाद केले.
त्याचबरोबर, 100 चेंडूच्या या सामन्यात 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओव्हल इन्विन्सिबल्स महिला संघाने चांगली सुरुवात केली नाही. परंतु संघाने हे लक्ष्य 98 चेंडू खर्च करत आणि 5 विकेट शिल्लक ठेवत गाठले.
ओव्हल संघासाठी कर्णधार डॅन व्हॅन निकेरकने 42 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या, तर मारिजाणे कॅपने 27 चेंडूत 38 धावा केल्या आणि मॅडी विलियर्सने 16 धावा केल्या. त्याचबरोबर जॉर्जिया ऍडम्सने 12 धावा केल्या. मॅनचेस्टरकडून कॅप्टन कॅट क्रॉसने 3 गडी बाद केले, तर सोफी इक्लेस्टोन आणि लॉरा जॅक्सनने प्रत्येकी 1 बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
-केएल राहुलच्या ‘त्या’ कृतीतून दिसले देशप्रेम, चाहत्यांनी केले कौतुक, पाहा व्हिडिओ