---Advertisement---

‘इत्तू सा’, हिंदी भाषेबद्दल चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर डेविड मिलरने शेअर केले मजेशीर मीम

---Advertisement---

दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज फलंदाज डेविड मिलर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो आणि त्याच्या चाहत्यांसाठी सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. तो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आयपीएल १४ चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयोजित केला गेला आहे. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या मिलरने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक मीम शेअर करत चाहत्यांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले आहे.

मिलर सध्या श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेचा भाग आहे. राजस्थानन राॅयल्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याज्ञिक यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत प्रश्न विचारला की, कोणाला राजस्थान राॅयल्सचा ऍडमिन पाहायचा आहे का?  त्याच्या या ट्विटवर मिलरेने बाॅलिवुडचा ब्लॉकबस्टर सिनेमा ‘कभी खुशी कभी गम’ मधील एक मीम शेअर केले आणि त्यामध्ये लिहिलं होत, “बस किजिए, बहुत हो गया.”

त्याने पोस्ट केलेले मीम हिंदीमध्ये असल्यामुळे भारतीय चाहत्यांचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले आणि चाहत्यांना मिलरला हिंदी येते का? असे कोडे पडले. त्यानंतर एका चाहत्याने त्याला याबबत प्रश्नही विचारला की, ‘तुला हिंदी येते का?’ त्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना मिलरने पुन्हा एकदा त्याचा सेंस ऑफ ह्यूमर वापरला आणि एक आणखी हिंदी मीम शेअर केले.

या मीममध्ये ‘कपिल शर्मा शो’ मधील दादी हे पात्र साकारणारा अली असगर दिसत आहे आणि त्यामध्ये लिहिले आहे की “इत्तू सा.” यानंतर चाहत्यांना मिलरचा हा अंदाज आवडलेला दिसत आहे आणि त्याने शेअर केलेल्या या मीम्समुळे तो चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, आयपीएल १४ च्या पहिल्या टप्प्यात मिलरने ६ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १ अर्धशतकासह १०२ धावा केल्या आहेत. मिलरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत ८६ सामने खेळले असून यामध्ये त्याने १ शतक आणि १० अर्धशतकांच्या मदतीने १९५२ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट कोहली आणि एमएस धोनीच्या नेतृत्वातील जडेजाने सांगितला फरक; म्हणाला…

विराट ऐवजी भारताच्या वनडे, टी२० संघाचे नेतृत्वपद रोहितकडे सोपवणार? बीसीसीआय सचिवांनी दिले स्पष्टीकरण

“सध्याच्या भारतीय संघाची फलंदाजी द्रविड, गांगुली, लक्ष्मण, सचिन, सेहवाग यांच्या जवळपासही जाणारी नाही”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---