क्रिकेटच्या इतिहासात एका षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूबद्दल बोलायचे झाले तर, युवराज सिंगचे नाव सर्व भारतीय चाहत्यांच्या मनात प्रथम येईल. कारण सर्वांना ठाऊक आहे की युवराज सिंगने टी-२० क्रिकेटमध्ये एका षटकात ६ षटकार मारून ३६ धावा केल्या होत्या.
तसेच हर्शल गिब्सने वनडे क्रिकेटमध्ये हा पराक्रम केला आहे, पण वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणत्या भारतीय खेळाडूकडे आहे, हे कदाचित फारच कमी लोकांना माहिती असेल.
वनडे क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंनी बरेच विक्रम नोंदविले आहेत, पण एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम खास आहे. कारण या वेळी चाहत्यांनी त्या एका षटकाचा खूप आनंद लुटला असेल. म्हणूनच या खास लेखात आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या ३ भारतीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत.
३. झहीर खान (Zaheer Khan)
डावखुरा महान माजी गोलंदाज झहीर खान याच नाव या यादीत पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल कारण तो वेगवान गोलंदाज आहे. पण वनडेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही झहीर खानच्या नावावर आहे. २०००-०१ मध्ये जोधपूरमध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्ध हा पराक्रम केला होता. त्या सामन्यात झहीर खानने हेनरी ओलांगाच्या एका षटकात सलग ४ षटकार ठोकत एकूण २७ धावा फटकावल्या. याच षटकात एक मात्र धाव अजित आगरकरने केली.
त्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि सचिन तेंडुलकरने बरकतउल्ला खान स्टेडियमवर प्रेक्षकांना निराश केले नाही. मास्टर ब्लास्टरने १५३ चेंडूत १४६ धावांची खेळी केली आणि भारताने ५० षटकांत २८३/८ धावा केल्या होत्या.
२. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
वनडेत एका षटकात सर्वाधिक धावा करण्याऱ्या या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दुसर्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरने १९९९ साली न्यूझीलंडविरुद्ध हैदराबादमध्ये ख्रिस ड्रमच्या एका षटकात २८ धावा केल्या होत्या.
एक धाव त्याच्या सोबत फलंदाजीला असणाऱ्या अजय जडेजाने केली होती. हाच सामना आहे ज्यामध्ये सचिन तेंडुलकरने अवघ्या १५० चेंडूंत १८६ धावा केल्या आणि त्यावेळी भारताने ३७६ धावांची विशाल धावसंख्या बनवली. सचिनचा हा डाव नेहमीच लक्षात राहील.
सचिनच्या खेळीनंतर भारतीय संघाच्या ३७६ धावांच्या पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला केवळ २०२ धावा करता आल्या. या सामन्यात भारतीय संघाने १७४ धावांनी विजय मिळविला. भारतीय संघाचा हा मोठा विजय होता.
१. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)
भारतीय क्रिकेट संघाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सध्या नंबर ४ साठी सर्वाधिक पसंती मिळालेला फलंदाज श्रेयस अय्यरच्या फलंदाजीने मागील वर्षात एक करिश्मा दाखवला. २०१९ मध्ये विशाखापट्टणम येथे वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने हा करिश्मा केला होता.
खरं तर श्रेयस अय्यरने त्या सामन्यात रोस्टन चेझच्या एकाच षटकात ४ षटकार आणि एक चौकार ठोकत एकूण ३१ धावा केल्या होत्या. त्यापैकी एक धाव रीषभ पंत याने केली. या दरम्यान श्रेयसच्या बॅटमधून ३० धावा आल्या.
त्यावेळी श्रेयस अय्यर भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या सामन्यात श्रेयस अय्यरने ३२ चेंडूंत ५३ धावा केल्या होत्या आणि भारतीय संघाने १०७ धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-अनेक दिग्गजांनाही न जमलेला असा खास पराक्रम करणारा वीरेंद्र सेहवाग एकमेव भारतीय क्रिकेटपटू
-रैनाने म्हटले रोहितच पुढचा धोनी, तर रोहितने दिले ‘हटके’ प्रत्युत्तर
-लॉकडाऊनमध्ये कोणाबरोबर रहायला आवडेल?, ‘या’ खेळाडूने घेतले धोनीचे नाव…
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात हे ५ दिग्गज विदेशी खेळाडू दिसणार नाहीत, संघांचे टेन्शन वाढले
-हे ५ खेळाडू जिंकू शकतात आयपीएल २०२० ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर’ चा पुरस्कार
-४ असे वनडे सामने, जे टीम इंडियाने जिंकले केवळ १ धावेने