मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील रोमांचक लढत चाहत्यांना रविवारी (30 एप्रिल) अनुभवता आली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या केली आणि प्रत्युत्तरात मुंबईच्या फलंदाजांनीही तितक्याच ताकतीने विजयासाठी प्रयत्न केले. पण यादरम्यान एक वाद समोर आला. हा वाद म्हणजे यशस्वी जयस्वाल याच्या विकेटचा. नेटकरी या वादानंतर मुंबई इंडियन्सला ट्रोल करताना दिसत आहेत.
राजस्थान रॉयल्स संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने या सामन्यात 62 चेंडूत 16 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 124 धावा केल्या. जयस्वाच्या या धमाकेदार शतकाच्या जोरावर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने तीन चेंडू आणि 6 विकेट्सने सामना जिंकला. जयस्वाल आजून काही धावा करू शकत होता. पण शेवटच्या षटकात त्याने एक फुलटॉस चेंडूवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि झेलबाद झाला.
19व्या षटकातील हा चौथा चेंडू होता, जो अर्शद खानने टाकला होता. चेंडू फलंदाजांच्या कंबरेच्या वर होता, त्यामुळे पंचांनी नो बॉलचा विचार केला. तिसऱ्या पंचांनी वेगवेगळ्या ऍन्गलने रिप्ले पाहिला. अनेकांच्या मते हा चेंडू नो बॉल होता. पंचांनी चेंडू योग्य असल्याचा करार दिला. परिणामी जयस्वालला विकेट गमवावी लागली. जयस्वालच्या विकेटचा वाद सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. नेटकरी मोठ्या प्रमाणात मुंबई इंडियन्सला ट्रोल करत आहेत. काही नेटकरी मुंबईसोबतच चेन्नई सुपर किंग्जलाही ट्रोल करताना दिसले. राजस्थानच्या एका चाहत्याने या चेंडूला नो बॉल करार दिला आणि मुंबई इंडियन्ससह चेन्नई सुपर किंग्जवर आयपीएलमध्ये कामयची बंदी आणावी असी मागणीच केली.
https://twitter.com/suprsuraj/status/1652707836919709698?s=20
https://twitter.com/Fanpointofviews/status/1652706286927233027?s=20
https://twitter.com/Fanpointofviews/status/1652706286927233027?s=20
https://twitter.com/45Fan_Prathmesh/status/1652706616830210048?s=20
दरम्यान, मुंबई इंडियन्सची सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी अनुक्रमे 3 आणि 28 धावा केल्या. मात्र त्यानंतर मुंबईसाठी खेळपट्टीवर येणाऱ्या प्रत्येक खेळाडूने वादळी खेळी केली. मध्यक्रमात सूर्यकुमार यादव याने 29 चेंडूत 55, तिलक वर्मा याने 21 चेंडूत 29*, तर टिम डेविड याने अवघ्या 14 चेंडूत 45* धावा ठोकल्या. परिणामी शेवटच्या षटकांमध्ये मुंबईची धावगती वाढली आणि संघाला विजय मिळाला. (The netizens are trolling Mumbai Indians because of Yashasvi Jaiswal’s wicket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बर्थडे दिवशी रोहित ठरतो कमनशिबी! आजवर आयपीएलमध्ये राहिलीये अशी कामगिरी
पंजाबकडून हरल्यावर धोनीने लावली गोलंदाजांची क्लास! म्हणाला, ‘त्यांना माहिती हवं की…’






