आयपीएल २०२०चा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्लीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांना २० षटकांत ७ बाद १५६ धावाच करता आल्या.
यापूर्वी आयपीएलच्या अंतिम सामन्यात ४ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १६० पेक्षा कमी धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या चारही वेळेस प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे.
तसेच आत्तापर्यंत ५ आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १६० ते १९९ धावा केल्या आहेत. त्यावेळी ४ वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ पराभूत झाला आहे. तर १ वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. २०१० ला मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पराभूत झाले होते.
याबरोबरच आयपीएलमध्ये ३ वेळा अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या तिनही वेळी प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे.