दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज मॅथ्यू ब्रीट्झकेने (South Africa Matthew Breetzke) असा कारनामा केला आहे, जो वर्ल्ड क्रिकेटमध्ये आजपर्यंत कुणालाच शक्य झाला नाही. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात ब्रीट्झकेने जोरदार अर्धशतक ठोकले. या अर्धशतकासह ब्रीट्झके हा क्रिकेटमध्ये पहिल्या पाच वनडे डावांमध्ये सलग पाच अर्धशतके ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. ब्रीट्झके शतकापर्यंत पोहोचले नाही, पण त्याने 85 शानदार धावा केल्या. या डावात प्रोटियाज संघाच्या फलंदाजाने 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेमध्ये नंबर चारवर फलंदाजीस आलेल्या ब्रीट्झकेने 77 चेंडूत 85 धावांची शानदार पारी खेळली. या खेळीदरम्यान त्याने 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
ब्रीट्झके हा पहिल्या पाच वनडे डावांमध्ये सलग अर्धशतके ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. या पहिल्या पाच एकदिवसीय सामन्यात ब्रीट्झकेने आतापर्यंत एकूण 463 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये पहिल्या पाच सामन्यानंतर सर्वाधिक धावा करणारा विक्रमही आता ब्रीट्झकेच्या नावावर आहे. त्याने 463 धावा 94 ची सरासरी आणि 104 च्या स्ट्राइक रेटने ठोकल्या आहेत.






