क्रिकेटच्या इतिहासात अनेक वादग्रस्त सामने झाले आहेत. अनेक वादग्रस्त निर्णय मैदानावर दिले जातात. खेळाडूंमध्ये भांडणे होतात आणि पंचांबरोबर वादही होतात, पण 2006 साली 20 ऑगस्ट रोजी जे घडले ते कदाचित क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. आम्ही बोलत आहोत, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटीबद्दल, जी एका वादामुळे मध्येच रद्द करावी लागली होती. त्यानंतर तिचा निकाल तीन वेळेस लागला.
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम-उल-हक आणि पंच डॅरेल हेअर यांच्यात खडाजंगी झाली होती. प्रकरण होते चेंडू छेडछाडीचे, जे पाकिस्तानने स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर असे काही झाले की हा सामना झालाच नाही आणि शेवटी इंग्लंडला या सामन्याचा विजेता घोषित करण्यात आले. आज आपण कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त सामन्याची कथा जाणून घेणार आहोत.
ओव्हल मैदान, जिथे पहिल्या डावात पाकिस्तानी गोलंदाजांनी इंग्लंडला अवघ्या 173 धावांवर गुंडाळले. यानंतर इंझमाम-उल-हकच्या संघाने पहिल्या डावात 504 धावांची मोठी धावसंख्या उभारली. पण दुसऱ्या डावात इंग्लंड फलंदाजी करत असताना असे काही घडले, ज्यामुळे सर्व चाहत्यांना धक्का बसला.
इंग्लंड संघाने दुसऱ्या डावात 4 बाद 298 धावा केल्या होत्या आणि मग मैदानावर असे काही घडले की ज्यामुळे संपूर्ण वातावरण बिघडले. पंच डॅरेल हेअर यांनी पाकिस्तानी गोलंदाजांवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला. पाकिस्तानी कर्णधार इंझमाम-उल-हकने हे आरोप जोरदारपणे फेटाळून लावले. पाकिस्तानचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये चहासाठी गेले आणि त्यानंतर ते मैदानावर आलेच नाहीत.
इंझमामने संघाला ड्रेसिंगरूममध्येच थांबवले
चहापानानंतर जेव्हा पाकिस्तानी संघ मैदानात उतरला नाही, तेव्हा संपूर्ण क्रिकेट जग हादरले. खरं तर, कॅप्टन इंझमाम-उल-हकने संपूर्ण संघाला ड्रेसिंग रूममध्ये ठेवले. जेव्हा खूप उशीर झाला तेव्हा कर्णधाराने आपल्या खेळाडूंना मैदानावर नेण्यास सुरुवात केली, पण त्याला खूप उशीर झाला होता. पंचांनी खेळ संपवला आणि इंग्लंडला सामन्याचा विजेता घोषित केले. कसोटी इतिहासात हे असे पहिल्यांदाच घडले होते. जेव्हा एक सामना अशा प्रकारे रद्द करण्यात आला आणि संघाला विजेता घोषित करण्यात आले.
महिन्याभरानंतर इंजमामवर लावली बंदी
सामना संपल्यानंतर या विषयावर बरीच चर्चा झाली, पण पंचांनी इंग्लंडला विजयी घोषित केले आणि ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते. एका महिन्यानंतर, आयसीसीसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आयसीसीने पाकिस्तान संघावरून चेंडू छेडछाडीचे आरोप काढून टाकले, पण त्यांचा कर्णधार इंझमाम-उल-हकवर चार एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात आली. इंझमाम खेळाचा अपमान केल्याप्रकरणी दोषी आढळला होता.
दोन वर्षांनंतर कसोटी अनिर्णित घोषित करण्यात आली
ओव्हल कसोटी आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी डागासारखी झाली होती. त्यांनी आयसीसीशी या विषयावर बोलणे सुरू ठेवले आणि शेवटी दोन वर्षांनंतर या कसोटी सामन्याला अनिर्णित घोषीत करून निकाल लावण्यात आला. पण पाकिस्तानने सुटकेचा नि: श्वास टाकण्यापूर्वीच मेलबोर्न क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीने आयसीसीला आपल्या सूचना दिल्या आणि मग पुन्हा एकदा इंग्लंडला विजयी घोषित केले.
हा सामना पाकिस्तानी क्रिकेट इतिहासावरील डाग आहे. 2-3 वर्षे तो या प्रकरणावर लढा देत राहिला आणि शेवटी त्याचा पराभव झाला आणि इंझमामवर चार एकदिवसीय सामन्यांची बंदीही घालण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या –
छोरी छा गयी! १८ वर्षाची ‘अंतिम’ बनली कुस्तीची नवी वर्ल्ड चॅम्पियन