---Advertisement---

कोहलीशी तुलना होणारा खेळाडू पाकिस्तानचा नवा कर्णधार

On: बुधवार, मे 13, 2020 7:23 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा केली. त्यानंतर पीसीबीने २५ वर्षीय बाबर आझमकडे पाकिस्तानच्या वनडे व टी२० संघाच्या पुर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी दिली.

यापुर्वी त्याने २०१९-२०२०मध्ये ५ टी२० सामन्यात पाकिस्तान संघाचे नेतृत्त्व केले होते. तो गेल्या ५ वर्षातील पाकिस्तानचा ६वा तर इतिहासातील ३०वा वनडे कर्णधार ठरणार आहे.

कसोटी संघाचे नेतृत्त्व मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ३५ वर्षीय अझहर अलीकडे कायम ठेवले असून त्याने आतापर्यंत ६ कसोटी सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्त्व केले आहे.

बाबरकडे एक प्रतिभावान क्रिकेटपटू म्हणून पाहिले जाते. त्याने २६ कसोटीत १८५० धावा, ७४ वनडेत ३३५९ तर ३८ टी२० मध्ये  १७४१ धावा केल्या आहे.

५ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याची तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ४५पेक्षा जास्त सरासरी असून त्याची तुलना पाकिस्तानी चाहते व आजी माजी खेळाडू सतत विराट कोहलीशी करत असतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---