टी-२० विश्वचषकानंतर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका २६ नोव्हेंबरपासून खेळली जाणार आहे. मात्र, मालिका सुरू होण्याआधीच बांगलादेशी चाहत्यांनी ती रद्द करण्याची मागणी केली आहे. बांगलादेशच्या चाहत्यांच्या मते पाकिस्तान संघ सराव सत्रामध्ये त्यांच्या देशाचा झेंडा लावत आहे आणि यातून काय साध्य करू इच्छित आहे, असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे. चाहत्यांनी पाकिस्तानच्या प्रत्येक झेंड्यावर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे.
पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक सक्लेन मुश्ताक यांनी पाकिस्तान संघाच्या सराव सत्रामध्ये स्वतःच्या देशाचा झेंडा लावण्याची प्रथा सुरू केली आहे. मुश्ताक यांच्या मते यामुळे खेळाडूंचा उत्साह वाढतो आणि परिणामी सामन्यात संघाला याचा फायदा मिळतो. त्यांनी टी-२० विश्वचषकातही अशाच प्रकारे सराव सत्रात स्वतःच्या देशाचा झेंडा लावला होता. त्यानंतर पाकिस्तानने टी-२० विश्वचषकात चांगले प्रदर्शनही केले होते.
आता बांगलादेश दौऱ्यावरही त्यांनी ही प्रथा कायम ठेवली आहे. मात्र, बांगलादेशच्या चाहत्यांना पाकिस्तान संघाने चालवलेला हा प्रकार आवडलेला दिसत नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बांगलादेशमधील त्यांच्या संघाच्या सराव सत्रातील एक फोटो शेअर केला आहे, पण चाहत्यांना ही गोष्ट खटकली आहे. चाहते सोशल मीडियावर याविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. अनेकांनी तर थेट ही मालिका रद्द करण्याचीच मागणी केली आहे. असे असले तीर, बांगलादेश क्रिकेट बोर्डने याबाबत अध्याप कसलीच भूमिका घेतलेली नाही.
Pakistan started preparation ahead of three-match T20I and two-match Test series against Bangladesh. Pakistan team hoists a national flag there– surely a new scene here. Cannot remember any team doing it here in recent past. Finally some int'l cricket in Mirpur. #BANvPAK pic.twitter.com/922Alf4LeC
— Saif Hasnat (@saifhasnat) November 15, 2021
एका बांगलादेशी चाहत्याने सोशल मीडियाच्या माध्यामतून त्याचे मत स्पष्टपणे मांडले आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “पाकिस्तान परत जावा. बांगलादेशने ही मालिकी थांबवली पाहिजे. पाकिस्तानच्या प्रत्येक झेंड्यावर बांगलादेशमध्ये बंदी आणली पाहिजे.”
Go back Pakistan. Bangladesh should stop the series. Ban any kind of Pakistani flag in Bangladesh.#RecogniseTheGenicide1971 https://t.co/viUEAx5Nfq
— Shahajada Shah Pervez 🇧🇩 (@ShahajadaShahP) November 15, 2021
तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “अनेक देशांच्या संघांनी बांगलादेशचा दौरा केला. कितीतरी सामने खेळले गेले आणि त्यच्या आधी सराव केला गेला, पण कोणत्याच संघाला स्वतःचा झेंडा मैदानावर लावून सराव करण्याची गरज नाही पडली. पण पाकिस्तान असे का करत आहे, ते काय दाखवू इच्छितात.”
बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी निवडला गेलेला पाकिस्तान संघ –
बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान, अब्दुल्ला शफीक, आबिद अली, अजहर अली, बिलाल आसिफ, फहीम अशरफ, हसन अली, फवाद आलम, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, मोहम्मद अब्बास, मोहम्मद नवाज, नसीम शाह, नौमान अली, साजिद खान, सरफराज अहमद, सऊद शकील, शाहीन शाह अफरीदी, जाहिद महमूद
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाचे ‘हे’ २ खेळाडू ठरू शकतात हुकमी एक्के
रोहितने आत्तापर्यंत १९ टी२० सामन्यात केलं आहे भारतीय संघाचे नेतृत्व, वाचा त्याचे जय-पराजयाचे रिकॉर्ड