पाकिस्तान क्रिकेट संघ मागच्या काही वर्षांमध्ये अप्रतिम क्रिकेट खेळत आला आहे. यादरम्यान त्यांनी अनेक मालिका नावावर केल्या, पण एक असे कारण आहे, ज्यामुळे पाकिस्तान संघ नेहमीच ट्रोल देखील होत आला आहे. हे कारण म्हणचे पाकिस्तान संघातील खेळाडूंची इंग्रजी. इंग्लंडविरुद्ध मायदेशात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह देखील त्याच्या खराब इंग्रजीमुळे ट्रोल झाला आहे.
क्रिकेट खेळातील प्रदर्शन आणि इंग्रजी यांच्या तसा पाहिला तर लांब-लांबपर्यंत संबंध येत नाही. पण सामना जिंकल्यानंतर किंवा गमावल्यानंतर जेव्हा कर्णधार माध्यमांशी चर्चा करतो, तेव्हा तो बहुतांश वेळा इंग्रजीमध्येच बोलत असतो. पाकिस्तान संघाचे खेळाडू मात्र ऐन याच प्रसंगी अनेकदा ट्रोल होत आले आहेत. कारण त्यांच्या खेलाडूंची इंग्रजी कमजोर आहे आणि ही गोष्टी यापूर्वी अनेकदा दिसून देखील आली आहे. इंग्लंड संघ सध्या कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. नसीम शाह () या मालिकेपूर्वी माध्यमांशी बोलत होता. पण यादरम्यान इंग्रजी कमजोर असल्यामुळे त्याने स्वतःचे हसू करून घेतले आहे.
इंग्लंडविरुद्धची ही मालिका 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्याआधी माध्यमांशी बोलणाऱ्या नसीमसा पत्रकारांनी इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनविषयी प्रश्न विचराला. उत्तर देताना नसीम म्हणाला की, “ही खूप मोठी उपलब्धी आहे, कारण तो एक वेगवान गोलंदाज आहे. मला माहिती आहे, ही गोष्ट किती अवघड आहे. तो एक दिग्गज आहे. आम्ही त्याच्याकडून खूप काही शिकलो आहोत. जेव्हा कधी आम्ही भेटतो, तेव्हा याविषयी चर्चा होते. तो 40 वर्षांचा आहे आणि अजूनही खेळतो. अजूनही फिटनेस चांगली आणि यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की, तो किती मेहनत करत असेल.”
नसीमने या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित दिले असले तरी, पुढच्या प्रश्नाचे उत्तर देताना मात्र त्याला शब्द अपुरे पडले. पत्रकाराने त्याला चेंडूची गती आणि शैली याविषयी प्रश्न विचारला असता, त्याने इंग्रजीमध्ये उत्तर दिले की, “मला फक्त 30 टक्के इंग्लंज येते. माझी इंग्रजी आता संपली आहे, ओके.” नसीमने दिलेले हे उत्तर ऐकून पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्वजण हसू लागले. दरम्यान, इंग्लंड संघ तब्बल 17 वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. तत्पूर्वी दोन्ही संघांमध्ये टी-20 विश्वचषक 2022च्या आधी सात सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली होती. (The Pakistani bowler admitted to not being able to speak English in a press conference)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंडिया ए चे बांगलादेशवर वर्चस्व! आधी गोलंदाजांचा करिष्मा, नंतर फलंदाजांचा वरचष्मा
आरसीबीसी हॅन्डीकॅप स्नुकर स्पर्धेत मझहर ताहेरभॉय याला विजेतेपद