वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(6 फेब्रुवारी) पहिला टी20 सामना वेलिंग्टन येथील वेस्टपॅक स्टेडीयमवर सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात हार्दिक आणि कृणाल हे पंड्या बंधूही आज पहिल्यांदाच भारताकडून एकत्र खेळत आहेत. कृणाल आणि हार्दिक याआधी वैयक्तिकरित्या भारताकडून खेळले आहेत. पण भारताकडून एकत्र खेळण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे.
त्यामुऴे हे पंड्या बंधू ही भारताकडून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये एकत्र खेळणारी तिसरीच भावांची जोडी ठरली आहे.
याआधी भारताकडून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मोहिंदर अमरनाथ – सुरिंदर अमरनाथ आणि युसुफ पठाण – इरफान पठाण या भावांच्या जोड्या खेळल्या आहेत. अमरनाथ बंधू 3 वनडे सामन्यात एकत्र खेळले आहेत. तर पठाण बंधू 8 वनडे आणि 8 टी20 एकत्र खेळले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एकत्र खेळणारी भारताची दुसरी भावांची जोडी-
त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारताचे एकत्र प्रतिनिधित्व करणारी हार्दिक-कृणालची दुसरीच भावांची जोडी ठरली आहे. याआधी पठाण बंधू या भावांच्या जोडीने आंतरराष्ट्रीय टी20 8 सामन्यात भारताचे एकत्र प्रतिनिधित्व केले आहे. विषेश म्हणजे पठाण आणि पंड्या बंधू हे बडोदाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–पहिल्या टी२०साठी असा आहे अंतिम ११ जणांचा संघ
–न्यूझीलंड-भारत टी२० मालिका हा संघ जिंकणार, जाणून घ्या कारण
–मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी या महिन्यातील ही आहे सर्वात मोठी खुशखबर