---Advertisement---

Video: भारताने पैसे देणे बंद केले, तर उध्वस्त होईल पाकिस्तान क्रिकेट, पीसीबी अध्यक्षांचा खुलासा

On: शुक्रवार, ऑक्टोबर 8, 2021 5:49 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष रमीज राजा यांनी बुधवारी(६ ऑक्टोबर) एक मोठा खूलासा केला आहे. पीसीबी अध्यक्ष बुधवारी आयपीसीच्या स्टॅंडिंग समितिच्या बैठकीत बोलत होते. यावेळी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट यांच्यातील संबंधांविषयी त्यांनी भाष्य केले आहे. रमीज राजांनी यावेळी भारताच्या मदतीने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चालत असल्याचे स्पष्ट केले आहे.

रमीज राजा बुधवारी म्हटले की, जर भारत सरकारची इच्छा असेल तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ढासळू शकते. त्यांनी याचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, पीसीबीला मिळणाऱ्या फंडिंगपैकी ५० टक्के फंडिंग ही आयसीसीकडून मिळते आणि आयसीसी त्यांची ९० टक्के फंडिंग भारताच्या मार्केटमधून मिळवते. त्यामुळे भारताच्या मदतीने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चालत आहे. जर भारतीय पंतप्रधानांनी फंडिंग थांबवण्याचा निर्णय घेतला, तर पाकिस्तान क्रिकेट उध्वस्त होईल.

रमीजने पुढे असेही सांगितले की, ‘एका मोठ्या गुंतवणूकदाराने मला सांगितले आहे की, पाकिस्तान क्रिकेट संघासाठी ते कोरा चेक देतील, पण असे तेव्हा होईल, जेव्हा पाकिस्तान क्रिकेट संघ आगामी विश्वचषकात भारताला पराभूत करेल.’

दरम्यान, मागच्या काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरेक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता. त्यानंतर लगेचच इंग्लंडनेही त्यांचा पाकिस्तान दौरा रद्द केला. या घटनेनंतर पाकिस्तानची जागतिक क्रिकेटमध्ये चांगलीच नाचक्की झाली होती. पीसीबी अध्याक्षांनी विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघाला सुचना केली आहे की, त्यांना विश्वचषकादरम्यान चांगले प्रदर्शन करून त्यांची गमावलेली छबी पुन्हा मिळवायची आहे.

https://twitter.com/porinju/status/1446444065730404352

भारत आणि पाकिस्तानमधील विश्वचषकात खेळल्या गेलेल्या सामन्यांचा विचार केला तर, पाकिस्तानने भारतीय संघाविरुद्ध विश्वचषकात एकही सामना जिंकलेला नाही. एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघ सात वेळ एकमेकांसमोर आले आहेत आणि सातही वेळा भारताने सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच टी २० विश्वचषकात दोन्ही संघ पाच वेळा आमने सामने आले असून यापैकी चार सामने भारतीय संघाने जिंकले आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे.

आगामी टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान त्यांच्या अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्धच्या सामन्याने करणार आहेत. हा सामना २४ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आता गोलंदाजांनाही मिळू शकते फ्री हिट, ‘या’ स्पर्धेपासून क्रांतिकारक नियम होऊ शकतो लागू

बीसीसीआयची मोठी घोषणा! ‘या’ दिवशी टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची नवी जर्सी होणार लॉन्च

भारताला विश्वचषकात हरवले, मिळेल कोरा चेक, पाकिस्तान संघाला मोठी ऑफर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---