आज (19 जानेवारी) ओवल (Oval) येथे भारत ‘अ’ विरुद्ध न्यूझीलंड ‘अ’ (India ‘A’ vs New Zea land ‘A’) संघात दुसरा सराव सामना पार पडला. हा सराव सामना भारत ‘अ’ने 12 धावांनी (Won by 12 Runs) जिंकला. या सामन्यात भारत ‘अ’ संघाचा फलंदाज पृथ्वी शाॅने (Prithvi Shaw) उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
शाॅने 100 चेंडूत 150 धावा केल्या आहेत. यामध्ये 22 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या खेळीमुळे प्रथम फलंदाजी करताना भारत ‘अ’ संघाने 49.2 षटकात सर्वबाद 372 धावा केल्या.
मागील काही दिवसांपूर्वी रणजी ट्राॅफीमध्ये शाॅला खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) देखरेखीखाली त्याच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर आता त्याने आज क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे.
आज झालेल्या या सामन्यात शॉ व्यतिरिक्त भारत ‘अ’ संघाकडून विजय शंकरने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी दिलेल्या 373 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाला निर्धारित 50 षटकात 6 बाद 360 धावा करता आल्या.
त्यांच्याकडून जॅक बॉइलने 130 धावांची शतकी खेळी तर फिन ऍलेनने 87 धावांची अर्धशतकी खेळी केली. भारताकडून इशान पोरेल आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
अखेर तो दिवस आलाच ज्याची भारतीय क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पहात होते
वाचा- ????https://t.co/w2hMlvqodv????#म #मराठी #Cricket #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) January 19, 2020
अशी वाईट वेळ दक्षिण आफ्रिका संघावर कधी आली नव्हती
वाचा- ????https://t.co/K3GO9UNd9K????#म #मराठी #Cricket— Maha Sports (@Maha_Sports) January 19, 2020