इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात गुजरात टायटन्सच्या रूपात चाहत्यांना एक नवीन विजेता संघ मिळाला. गुजरात टायटन्सचे या हंगामातील प्रदर्शन खरोखर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अगदी सुरुवातीपासून त्यांचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता आणि अखेर विजेतेपद देखील त्यांनीच पटकावले. राजस्थान रॉयल्सला जरी विजेतेपद पटकावता आले नसले, तरी त्यांचे हंगामातील प्रदर्शन पाहून आयपीएल २०१३ मध्ये चेन्नई सपुर किंग्जने केलेले प्रदर्शन आठवते.
आयपीएल २०२२ हंगामात पर्पल आणि ऑरेंज कॅप जिंकणारे खेळाडू राजस्थान रॉयल्सचे आहेत. तसेच यष्टीपाठी सर्वाधिक खेळाडूंना बाद करणारा यष्टीरक्षक देखील राजस्थानचाच आहे. राजस्थानच्या रियान परागने हंगामात सर्वात जास्त झेल घेतल्या आहेत. अगदी अशीच कामगिरी चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०१३ मध्ये केली होती.
आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर (१७ सामन्यांमध्ये ८६३ धावा) ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला, तर त्यांचाच फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (१७ सामन्यांमध्ये २७ विकेट्स) पर्पल कॅपचा मानकरी ठरला. राजस्थानचा यष्टीरक्षक फलंदाज आणि कर्णधार संजू सॅमसनने या हंगामात यष्टीपाठी सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत. तसेच रियान पराग या हंगामात सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला आहे. हे सर्व काम करून देखील राजस्थानला विजेतेपद मात्र पटकावता आले नाही.
आयपीएल २०१३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने देखील राजस्थानप्रमाणेच कामगिरी केली होती. त्या हंगामात मायकल हसीने सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. त्यानंतर ड्वेन ब्रावोने सर्वाधिक विकेट्स घेतल्यामुळे त्याला पर्पल कॅप मिळाली होती. कर्णधार एमएस धोनीने यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सर्वाधिक खेळाडूंना तंबूत धाडले होते. तसेच ड्वेन ब्रावो सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला होता.
दरम्यान, राजस्थान आणि गुजरात यांच्यातील रविवारी (२९ मे) खेळल्या गेलेल्या सामन्याचा विचार केला, तर गुजरातने हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ९ विकेट्स गमावल्या आणि अवघ्या १३० धावा उभ्या केल्या. हे लक्ष्य गाठण्यासाठी गुजरातला खास काही अडचण आली नाही. त्याने ३ विकेट्सच्या नुकसानावर आणि १८.१ षटकात हे लक्ष्य गाठले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
गुजरात टायटन्स आयपीएल ट्रॉफी जिंकलंय, पण हा विजय किती खास? पाहा एक बाणात किती रेकॉर्ड केले
गुजरातचे प्रशिक्षक कर्स्टन म्हणातेय, ‘नेहराबरोबर काम करण्याची मजाच वेगळी, तो…’
आयपीएलचा किताब जिंकल्यानंतर गुजरातच्या खेळाडूंचे जोरदार सेलिब्रेशन, Photoतून तुम्हीही घ्या आनंद