दिल्ली कॅपिटल्सला शनिवारी (20 मे) चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला. सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 223 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीला 146 धावांवर समाधान मानावे लागले. सीएसकेने हा सामना 77 धावांनी जिंकला आणि फ्लेऑफमध्ये जागा पक्की केली. सामना संपल्यानंतर धोनीने सीएसलेला मिळालेल्या यशाचे कारण स्पष्ट केले.
दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून सीएसकेला प्लेऑफमध्ये जागा मिळवून दिल्यानंतर एमएस धोनी (MS Dhoni) माध्यमांशी बोलला. तो म्हणाला, “यशाला कोणताच पर्याय नसतो. पण आपल्या संघातील खेळाडूंवर विश्वास ठेवून आणि त्यांना सर्वोत्तम प्रदर्शनासाठी आत्मविश्वास देऊन हे साध्य करता येऊ शकते.” धोनीने आपल्या 14 आयपीएल हंगामांमध्ये 12व्या वेळी प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. आपल्या संघाला प्लेऑफमध्ये सातत्याने पोहोचवण्याविषयी देखील धोनीला प्रश्न विचारला गेला.
यावर धोनीने उत्तर दिले की, “याची कोणतीच ठरलेली पद्धत नाहीये. आम्ही सर्वोत्तम खेळाडू निवडतो आणि त्यांना योग्य जागी खेळवतो. खेळाडू ज्याठिकाणी कमजोर आहेत, त्याठिकाणी त्यांच्याकडून सराव करून घेतो. संघ व्यवस्थापनालाही याचे श्रेय दिले पाहिजे. पण सर्वात महत्वाची भूमिका खेळाडूंचीच असते. खेळाडू नसतील, तर आम्हीही काहीच करू शकणार नाही. आम्ही खेळाडूंच्या वैयक्तिक प्रदर्शनावर लक्ष देत नाही, आम्ही फक्त संघाच्या प्रदर्शनावर लक्ष देत आहोत.”
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवेसह सीएसकेचे गोलंदाज देखील चमकदार कामगिरी करताना दिसले. ऋतुराजने 50 चेंडूत 79 धावा केल्या, तर कॉनवेने 52 चेंडूत 87 धावांची सर्वोत्तम खेळी केली. गोलंदाजी विभागात दीपक चाहर सर्वात यशस्वी ठरला. चाहरने 4 षटकात 22 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. महिशा थिक्षणा आणि मथिशा पथिराना यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडे आणि रविंद्र जडेजा यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. (the players are most important, said MS Dhoni )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या फिटनेसविषयी सीएसके प्रशिक्षकाची मोठी माहिती, कर्णधार धावण्यासाठी करतोय संघर्ष
लनखनऊविरुद्ध केकेआरने जिंकली नाणेफेक, नितीश राणा म्हणाला, ‘हंगामातील शेवटच्या सामन्यात…’