---Advertisement---

करियरच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा शैक्षणिक कार्यासाठी राष्ट्रपती करणार सन्मान

On: शनिवार, ऑगस्ट 29, 2020 10:50 PM
---Advertisement---

माजी भारतीय क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी यांचा 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान झाला. हा सन्मान क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल नव्हे तर शिक्षण क्षेत्रात करिअर करण्यासाठी (क्रीडा शिक्षणातील योगदान) देण्यात येत आहे. निलेश संचलित क्रीडा व्यवस्थापन संस्थेला क्रीडा शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

२ ऑगस्टला अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कारांसह निलेश कुलकर्णी यांनाही सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यवस्थापन संस्थेची (आयआयएसएम) २०२० च्या राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कारासाठी निवड झाली आहे, असे क्रीडा मंत्रालयाचे सहसचिव एल. एस. सिंह यांनी सांगितले.

47 वर्षीय निलेशने कारकीर्दीत 3 कसोटी आणि 10 एकदिवसीय सामने खेळले. त्याने 10 वर्षांपूर्वी आयआयएसएम सुरू केले. संस्थेने पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देऊन देशात क्रीडा व्यवस्थापन शिक्षणाचा विडा उचलला आहे. नीलेश आणि त्यांची पत्नी रसिका ही संस्था अंधेरी, मुंबई येथे संयुक्तपणे चालवितात.

याबाबत प्राध्यापक रत्नाकर शेट्टी म्हणाले की निलेशने खरोखरच या संस्थेसाठी परिश्रम घेतले आहेत. खेलो इंडिया आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा इत्यादी खेळाच्या प्रत्यक्ष क्रियेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणं या प्रशिक्षणाला अतिशय विशेष बनविते.

निलेश कुलकर्णीची पदार्पणाच्या कसोटीत पहिल्याच चेंडूवर विकेट (Nilesh Kulkarni)

कसोटी क्रिकेटमध्ये २० खेळाडूंनी कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर कसोटीत विकेट घेतली आहे. भारताकडून निलेश कुलकर्णी अशी कामगिरी करणारा पहिला तर जगातील १५वा गोलंदाज ठरला होता. निलेशने ३ ऑगस्ट १९९७ रोजी कोलंबो येथे खेळताना श्रीलंकेचा महान फलंदाज मारवान आटापटूला कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. आजही भारताकडून असा विक्रम कुणालाही जमला नाही. याच कसोटीत भारताने पहिल्या डावात ८ बाद ५३७ धावा केल्यानंतर लंकेने याला उत्तर देताना ६ बाद ९५२ धावा केल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---