माऊंट मॉनगनुई| न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज तिसरा वऩडे सामना बे ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात सर्वबाद 243 धावा केल्या आहेत.
या सामन्यासाठी भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला संधी देण्यात आलेली नाही. त्याच्याऐवजी दिनेश कार्तिक यष्टीरक्षण करेल. तसेच विजय शंकरच्या ऐवजी हार्दिक पंड्याला संघात संधी मिळाली आहे.
आज(28 जानेवारी) सुरु असलेल्या सामन्यात भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत.
न्यूझीलंडकडून रॉस टेलर आणि टॉम लॅथमने अर्धशतके केली आहेत. टेलरने 93 आणि लॅथमने 51 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–पुजारा, जॅक्सनच्या शानदार शतकी खेळीमुळे सौराष्ट्र रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात
–हार्दिक पंड्या झाला सुपरमॅन, घेतला न्यूझीलंडच्या कर्णधाराचा अफलातून झेल, पहा व्हिडिओ
–राफाची बारी? नाही नाही, जोकरच भारी!!