नवी दिल्ली। आता युएईमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू खेळाडूंचा क्वारंटाईनचा अनिवार्य कालावधी संपला असल्याने कर्णधार विराट कोहलीसह सर्व खेळाडूंनी एकत्र वेळ घालवला आहे. आरसीबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडेलवरुन या दरम्यानची काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत, ज्यात सर्व खेळाडू खूप आनंदी दिसत आहेत.
छायाचित्रे शेअर करताना आरसीबीने लिहिले, ‘गुड व्हाईब्स ओन्ली! क्वारंटाईनमध्ये राहील्यानंतर दुबईमध्ये खेळाडू टीम बाँडिंग सत्रासाठी जमले.’ या छायाचित्रांमध्ये कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो देखील आहे, ज्यामध्ये तो फुटबॉल खेळताना दिसत आहे आणि तो खूप आनंदी असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी उमेश यादव बोटावर फुटबॉल फिरवताना दिसतो, तर लेगस्पिनर चहल गेम मशीनसह गेम खेळण्यात व्यस्त आहे.
Good vibes only! 🤩😁
The Royal Challengers got together for the first time after their quarantine in Dubai for a team bonding session!
(1/2)#PlayBold #IPL2020 #WeAreChallengers pic.twitter.com/eyVEbrSuLh
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) August 28, 2020
Good vibes only! 🤩😁
The Royal Challengers got together for the first time after their quarantine in Dubai for a team bonding session!
(2/2)#PlayBold #IPL2020 #WeAreChallengers pic.twitter.com/le2Qr2dF4K
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) August 28, 2020
यावेळीचा आयपीएलचा हंगाम 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे युएईला पोहचल्यानंतर सर्व संघांच्या सदस्यांना 6 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या दरम्यान त्यांची कोरोना चाचणीही झाली. त्यात निगेटिव्ह आलेल्या सर्वांना जैव-सुरक्षित वातावरणात प्रवेश देण्यात आला आहे. आयपीएल 2020 च्या या कालावधीत सर्व संघातील सर्व सदस्य जैव-सुरक्षित वातावरणातच राहतील. तसेच त्या सर्वांची नियमितपणे कोरोना चाचणी होईल.