नवी दिल्ली। बीसीसीआयमध्ये क्रिकेट संचालक म्हणून पदभार सांभाळणारे माजी क्रिकेटपटू सबा करीम यांनी नुकताच आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजीनाम्यानंतर बीसीसीआयकडून करीम यांच्याजागी प्रभारी म्हणून महाव्यवस्थापक (क्रीडा विकास) पदासाठी अर्ज मागविले आहेत.
बीसीसीआयचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी (Rahul Johri) यांचा राजीनामा स्विकारल्यानंतर करीम (Saba Karim) यांना या महिन्याच्या सुरुवातीला राजीनामा देण्यास सांगितले होते.
क्रीडा विकासका पदासाठी अर्जाची अंतिम तारीख ७ ऑगस्ट आहे.
बीसीसीआयच्या वेबसाईटनुसार, क्रीडा विकास महाव्यवस्थापक, सामने खेळण्याचे नियम, खेळपट्टी आणि आऊटफील्ड व्यतिरिक्त घरगुती सामन्यांचे वेळापत्रक तयार करणे आणि लक्ष ठेवण्यासाठी जबाबदार असतील.
यासाठीची सविस्तर जाहीरात https://www.bcci.tv/about/jobs या लिंकवर आपणास पहायला मिळेल. तसेच आपण जर योग्य उमेदवार असाल तर याच लिंकवर दिलेल्या ईमेल आयडीवर आपण आपला सीव्ही देखील पाठवू शकता. या लिंकवर गेल्यावर आपणास या पदासाठी ठेवण्यात आलेल्या पात्रताही दिसतील.
क्रीडा विकासकाच्या मुख्य पदावर मागील वेळी रत्नाकर शेट्टी कार्यरत होते. शेट्टी मार्च २०१८मध्येच निवृत्त झाले होते.
माजी भारतीय यष्टीरक्षक करीम यांना डिसेंबर २०१७ मध्ये महाव्यवस्थापक क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आले होते. ते देशांतर्गत आणि महिला क्रिकेटचे प्रभारी होते.
बीसीसीआय अध्यक्ष पदाच्या भविष्याबाबत निर्णय
सौरव गांगुली (Sourav Ganguly) बीसीसीआयच्या अध्यक्ष पदावर कार्यरत राहील किंवा मग त्याला कूलिंग ऑफ पिरियड (विश्रांती) मधून जाण्यासाठी पद सोडावे लागेल, यावर काही आठवड्यांमध्ये निर्णय घेतला जाईल. २७ जुलैला गांगुलीचा कार्यकाळ समाप्त होणार आहे, जे वाढविण्यासाठी सुनावणी होणार आहे. बोर्डाच्या घटनेनुसार, कोणत्याही पदावर राहण्यासाठी एकूण ६ वर्षांची मर्यादा आहे.
गांगुलीने बीसीसआयचे अध्यक्ष पद सांभाळण्यापूर्वी बंगाल क्रिकेट बोर्डाचा प्रमुख म्हणून काम पाहिले होते. त्याचबरोबर बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर त्याला केवळ ९ महिन्यांसाठी निवडण्यात आले होते.
बीसीसीआयने जाहीर केल्या आयपीएल २०२०च्या तारखा
आयपीएल २०२० चा मोसम १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान युएईमध्ये होणार असल्याची पुष्टी आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांनी शुक्रवारी (२४ जुलै) केली आहे. आयपीएलमध्ये यावेळी ५१ दिवसांत ६० सामने खेळले जाणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ साखळी फेरीत १४-१४ सामने खेळणार आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारतीय गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी वेस्ट इंडिजचा क्रिकेटर चालू सामन्यात येत असे स्टेडियमच्या बाहेर
-ऑनलाइन क्लासमध्ये सहभागी होण्यासाठी रोज डोंगरावर चढतो हा मुलगा; सेहवागने मदतीची व्यक्त केली इच्छा
-मित्रांनो त्या चुकिची शिक्षा मी आजही भोगतोय, तुम्ही असं करु नका!






